
pradeep purnekar
शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या फायरिंगनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला. “माझा माणूस मला आणून द्या,” असे म्हणत कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या. इतक्या गोळ्या आणि वार का करण्यात आले, त्यांनी कोणाचे काय बिघडवले होते, असा सवालही कुटुंबीयांनी केला. तरुण पिढी अमली पदार्थांमुळे वाया जाऊ नये यासाठी प्रदीप पूर्णेकर लढत होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. “लोकांसाठी आता काही करायचं नाही, स्वतःच्या परिवारासाठी करायचं. मला इलेक्शन, पॉलिटिक्स आणि राजनीती नको; मी खूप मोठी किंमत चुकवली,” अशा शब्दांत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.