लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगर मतदारसंघात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. नगरमधून विजयी झालेले नीलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत.
जयपुर येथील हत्याकांडाने सध्या खळबळ उडाली आहे. येथे एकाच घरातील तीन जणांची हत्या केल्यानंतर आरोपीने देखील रेल्वेखाली आपला जीव दिला आहे. नक्की काय घडले आणि प्रकरण काय जाणून घेऊया सविस्तर...
कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली. टू व्हिलरवरुन दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केला आणि या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Crime : मध्य प्रदेशातील जबलपुर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीने स्वत:च्या वडिलांसह भावाची हत्या केल्यानंतर पळ काढला होता. यामागील कारण काय आणि नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....
पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात आज तपास पथकाने ससून रुग्णालयात येऊन चौकशी केले असता आणखी गंभीर प्रकार समोर आले आहेत. मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेतल्याचं समोर आले आहे.
पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवड येथे दहशतवादविरोधी पथकाने 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून २९ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करून डीव्हीआर देखील लंपास केला.