
नाशिक-ठाणे महामार्गावर ३२ कोटींचे MD ड्रग्ज जप्त; दोन आरोपी अटकेत
नाशिक-ठाणे महामार्गावर ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत ३२ कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन आरोपी, तारीख तन्वीर अहमद अन्सारी (मुंब्रा) आणि महेश हिंदूराव देसाई (विठ्ठलवाडी), यांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून १५ किलो एमडी ड्रग्ज, दोन चारचाकी वाहने आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. आरोपी अन्सारीवर आधीच ३ तर देसाईवर ४ गुन्हे दाखल आहेत.