US Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. व्हाइट हाउसकडून याला लिब्रेशन डे (Liberation Day) म्हणून संबोधण्यात आले आहे.
US Reciprocal Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांनी 180 हून अधिक देशांवर टॅरिफ लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे टॅरिफ तातडीने लागू करण्यात येणार असून यामागील उद्देश असा आहे की, ट्रम्प प्रशासनाद्वारे चलनात हेराफेरी आणि व्यापारात उद्भवणाऱ्या समस्यांसह अनुचित व्यापारांचा सामना करण्याचा आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या टॅरिफ प्लॅनमुले नॉन लिस्टेड देशांकडून सर्व आयातींवर कमीतकमी 10 टक्क टॅरिफ वसूल केला जाणार आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, "असे करुन आम्हाला आमच्या नोकऱ्या पुन्हा मिळणार आहेत. आमचे उद्योग परत मिळतील, आम्ही लहान आणि मध्यम स्तरावरील व्यावसायिकांना पुन्हा मिळवू आणि आम्ही अमेरिकेला पुन्हा समृद्ध बनवू. आता अमेरिकेत नोकऱ्या दिसून येतील."
कोणत्या देशावर किती टॅरिफ लागू?
व्हाइट हाउसच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, सर्व देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करत आहोत, जो अमेरिकेकडून घेतल्या जाणाऱ्या टॅरिफच्या अर्धा असणार आहे. यावेळी ट्रम्प यांनी असे देखील म्हटले, जर चीन अमेरिकेकडून 67 टक्के टॅरिफ घेत असेल तर संयुक्त राज्य अमेरिका चीनकडून 34 टक्के टॅरिफ घेईल.
व्हिएतनाम येथून होणाऱ्या आयातीवर 46 टक्के, स्विर्त्झलँडवर 31 टक्के, ताइवानवर 32 टक्के, जापानवर 24 टक्के, ब्राझीलवर 10 टक्के, इंडोनेशियावर 32 टक्के, सिंगापुरवर 10 टक्के, दक्षिण आफ्रिकेवर 30 टक्के तर भारतावर 26 टक्के रेसिफ्रोकल टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. याशिवाय विदेशातून होणाऱ्या ऑटोमोबाइलच्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ तर ऑटो पार्टवर देखील तेवढाच टॅरिफ लागू होणार आहे. ऑटोमोबाइलवरील नवा टॅरिफ 3 एप्रिल आणि ऑटो पार्टवरील टॅरिफ 3 मे पासून लागू केला जाणार आहे.
पीएम मोदी चांगले मित्र- ट्रम्प
मेक अमेरिका वेल्थी अगेन कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी भारताबद्दल भाष्य केले. यावेळी म्हटले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. ते माझे उत्तम मित्र आहेत. पण तुम्ही आमच्यासोबत योग्य व्यवहार करत नाही आहात. भारत आपल्याकडून 52 टक्के शुल्क घेतो आणि आपण त्यांच्याकडून जवळजवळ काहीच घेत नाही.”