Aadhaar Update : आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात काही नियम आणि अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. खरंतर, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही मर्यादा आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Aadhaar Update : आधार कार्ड सध्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. शासकीय काम ते बँकेत खाते सुरु करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता लागते. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI कडून जारी केले जाते. आधार कार्डचा काही प्रकारच्या कामांमध्ये वापर करता येऊ शकतो. अशातच आधार कार्डवर स्वत: बद्दलची माहिती योग्य असणे अत्यावश्यक आहे. तुमच्या आधार कार्डवर जर चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करुन घ्यावी असा सल्ला दिला जातो. अन्यथा काही कामांमध्ये अडथळा येऊ शकतो.
आधार कार्डवर जन्मतारीख, मोबाइल क्रमांक आणि पत्ता अपडेट करता येऊ शकतो. आधार कार्ड UIDAI च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून myAadhaar पोर्टलच्या मदतीने अपडेट करता येते. सध्याच्या काळात कोणत्याही शुल्काशिवाय आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कितीवेळा आधार कार्ड अपडेट करू शकतो?
आधार कार्डवर काही अपडेट्स करता येतात. पण यासाठी काही मर्यादा देखील आहेत. आधार कार्डवर दाखल करण्यात आलेल्या नावामध्ये आयुष्यभर बदल करता येऊ शकतो. यासाठी UIDAI कडून मान्यता मिळणे आवश्यक असते. याशिवाय नागरिकाला नाव बदलण्यामागील कारण दाखवणारे कागदपत्रही जोडावे लागते. आधार कार्डवर नावाव्यतिरिक्त पत्ता बदलण्यासाठी देखील कोणताही नियम नाही.
वेळीच आधार कार्ड अपडेट न झाल्यास?
UIDAI कडून आधार कार्डसाठी 30 दिवसांच्या आतमध्ये मान्यता दिली जाते. याशिवाय संपूर्ण आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागतो. तुम्ही 1947 क्रमांकावर कॉल करुन अथवा UIDAI च्या वेबसाइटवरुनही आधार कार्डबद्दल अपडेट्स मिळवू शकता.
मोफत आधार कार्ड अपडेट
UIDAI कडून सर्व आधार युजर्सला कार्ड अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारनुसार, 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करावे असे सांगितले आहे. 14 डिसेंबर 2014 पूर्वी आधार कार्ड अपडेट केल्यास कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही आहे.
आणखी वाचा :