4. इको व्हिला कृषी पर्यटन केंद्र, पुणे
पुण्यातील शिवाजीनगरपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे इकोव्हिला कृषी पर्यटन अनेकांसाठी संजीवणी ठरत आहे. इकोव्हिल म्हणजे पुण्यातील केवळ कृषी पर्यटन नाही तर कृषी बरोबरच आर्ट फार्म आहे. शांत निवांत, तीन एकरात बहरलेल्या या बागेत नारळ, आंबा, जांभुळ, पेरू, बदाम, जांब, तेजपत्ता आदी देशी विदेशी झाडे आहेत. औषधी गुणकारी आणि सिझनल फळ देणारी झाड येथील खास आहे. ३.५ एकरात फळे, फुले, पालेभाज्या, औषध वनस्पती असे अनेक विभागातून आलेल्या पर्यटकांना विशेषता शाळेतील मुलांना शेती संस्कृती विषयी महीती होते.