हिवाळ्यात दही कसे लावायचे? जाणुन घ्या सोप्या टिप्स

थंड हवामानात दही लावणे कठीण वाटत असेल, पण काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही हे सहज करू शकता. कोमट दूध, उबदार जागा, योग्य प्रमाणात विरजण आणि थोडीशी काळजी घेतल्यास, हिवाळ्यातही तुम्हाला ताजे दही मिळेल.

हिवाळ्यात तापमान कमी असल्याने दही लावणे थोडे अवघड होऊ शकते. कारण थंड हवामानामुळे दह्यासाठी लागणारी उष्णता मिळत नाही आणि दही तयार होण्यास वेळ लागतो किंवा ते आंबट होत नाही. तापमान कमी होते तसतसे दुधात आंबण्याची प्रक्रिया मंदावते आणि नंतर लॅक्टो बॅसिलस बॅक्टेरिया तयार होत नाही. खालील पद्धतींचा वापर करून तुम्ही सहजपणे दही लावू शकता:

१. दूध गरम करून घ्या

दही लावण्यासाठी कोमट दूध वापरा. दूध खुप गरम किंवा खुप थंड नसावे. दूध कोमट म्हणजेच ३५-४० डिग्री सेल्सियस तापमानावर आणा.

२. गरम ठिकाणी ठेवा

हिवाळ्यात दही लावण्यासाठी दूध जास्त उबदार ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. दही लावलेले भांडे एका जाड टॉवेल किंवा कापडाने झाकुन घ्या. भांडे ओव्हनमध्ये (ओव्हन चालू न करता) किंवा बंद ठिकाणी ठेवले तरी चालेल.

३. दह्याची योग्य मात्रा घाला

दही तयार होण्यासाठी विरजण (थोडं तयार दही) लागते. १ लिटर दुधासाठी १-२ चमचे दही पुरेसे आहे. तयार दही कोमट दुधात मिसळा आणि व्यवस्थित हलवा.

आणखी वाचा-हिवाळ्यात पेरू खाणे चांगले आहे का?, जाणून घ्या 10 फायदे!

४. वेळ देणे

दही तयार होण्यासाठी ८-१२ तास लागतात. हिवाळ्यात हा वेळ थोडा वाढू शकतो. रात्री दही लावून ठेवल्यास सकाळपर्यंत ते तयार होईल.

५. गुणवत्तेचे दही वापरा

दही चांगल्या प्रतीचे असेल तर दही लवकर आणि व्यवस्थित जमतं.

६.थोडी उष्णता मिळवा

जर तापमान खूपच थंड असंल तर गरम पाण्याच्या बादलीत किंवा मोठ्या भांड्यात दह्याचं भांडं ठेवा.  पण पाणी आणि दह्याच्या भांड्याचा थेट संपर्क होऊ देऊ नका; दुसऱ्या पातळ भांड्याचा आधार घ्या.

आणखी वाचा- हिरवे वाटाणे खाण्याचे फायदे माहिती आहेत का?, हिवाळ्यातील आहे सर्वोत्तम सुपरफूड!

Share this article