रात्री स्वप्न पडलेलं सकाळी कसं विसरतो, कारण जाणून घ्या

रात्री पडलेली स्वप्ने सकाळी उठल्यावर अनेकांना आठवत नाहीत. ह्यामागे मेंदूची कार्यप्रणाली आणि झोपेचे वैज्ञानिक कारण आहे. स्वप्ने REM टप्प्यात पडतात पण मेंदूचा हिप्पोकॅम्पस कमी सक्रिय असल्याने ती लक्षात राहत नाहीत.

अनेकांना रात्री पडलेली स्वप्ने सकाळी उठल्यावर आठवत नाहीत. काही वेळा धूसर आठवते, तर काही वेळा पूर्ण विसरले जाते. यामागे मेंदूची कार्यप्रणाली आणि झोपेचे वैज्ञानिक कारण आहे, असे तज्ज्ञ सांगतात. 

मेंदू आणि स्वप्न विसरण्याची प्रक्रिया

तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या REM (Rapid Eye Movement) टप्प्यात स्वप्ने पडतात. पण याच वेळी मेंदूचा हिप्पोकॅम्पस, जो आठवणी साठवतो, तो कमी सक्रिय असतो. त्यामुळे स्वप्नांची माहिती कायमस्वरूपी स्मरणात राहत नाही.अचानक जाग आल्यासच स्वप्न लक्षात राहते, अन्यथा मेंदू ते विसरतो. सकाळी नवीन विचारांची भर पडल्याने रात्रीचे स्वप्न आठवत नाही. मेंदू केवळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो, त्यामुळे काही स्वप्ने विसरली जातात. 

स्वप्ने लक्षात ठेवण्यासाठी काय करावे?

उठताच स्वप्न लिहून ठेवा. स्वप्न आठवण्यावर जागृतीपूर्वक लक्ष केंद्रित करा. झोपण्याच्या आधी मेंदू शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

Share this article