मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, राहिल निरोगी

दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात सध्या प्रदुषणामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवल्या जात आहेत. काहींना श्वास घेण्यासही कठीण होत आहे. अशातच प्रदुषणाच्या वातावरणात मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Home remedies to boost immunity in kids : दिल्लीसह देशातील बहुतांश ठिकाणी प्रदुषणाचा स्तर 400 च्या पार गेला आहे. हवेची गुणवत्ता बिघडल्याने दिल्लीतील सर्व शाळांमधील पाचवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली-एनसीआरच्या क्षेत्रांमध्ये नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्कील होत आहे. अस्थमाच्या रुग्णांनाही घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. खरंतर, प्रदुषणासह रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्तींना सर्दी-खोकला असे हंगामी आजार होताना दिसून येत आहेत. याचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वृद्धांना निर्माण झाला आहे. अशातच मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत हे जाणून घेऊया.

मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती अशी वाढवा

हळदीचे पाणी
तुमचे मुलं 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक मोठा असल्यास त्याला हळदीचे दूध दररोज प्यायला द्या. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळदीचा भारतात आयुर्वेदिक औषधाच्या रुपात वापर केला जातो. हळदीत अँटीऑक्सिटेंड्सही असल्याने शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

जायफळाचा उपाय
जायफळामुळे पदार्थांची चव वाढली जाते.यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. ज्या मुलांना सतत सर्दी-खोकल्याचा त्रास उद्भवला जातो त्यांना जायफळच्या पावडरचे दूधातून सेवन करण्यास द्यावे. यामुळे थंडीत शरीर आतमधूनही गरम राहण्यास मदत होईल आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढली जाईल.

मध आणि आल
खोकल्यापासून दूर राहण्यासाठी मध आणि आल्याचा उपाय करू शकता. मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मध आणि आल उत्तम पर्याय आहे. यासाठी अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिक्स करुन मुलांना दररोज प्यायला द्या. रात्रीच्या वेळेस याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खरंतर, आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने सर्दी-खोकल्याच्या कारणास्तव येणारी सूज कमी होण्यास मदत होते.

गरम पाणी
मुलांच्या छातीमध्ये कफ जमा झाल्यास त्यांना गरम पाणी प्यायला द्या. यामुळे छातीमधील कफ बाहेर पडण्यास मदत होईल. याशिवाय पाण्यात कडुलिंब किंवा तुळशीची पाने घालून पाणी प्यायला द्या.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

चेहऱ्यावर हळदीचा फेस पॅक लावताना करू नका या 4 चुका, त्वचा होईल डल

पीरियड्स येण्याआधी पाय थरथरतात? जाणून घ्या कारण

Share this article