मंदिराचा पाया रचण्यापासून ते आताच्या बांधकामापर्यंत होती कित्येक आव्हाने
अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. दरम्यान मंदिराचा पाया रचण्यापासून ते आतापर्यंतच्या बांधकाम प्रक्रियेत कित्येक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला.
28
आव्हानांची माहिती कोणी दिली?
राम मंदिराचे बांधकाम करताना सर्वात मोठे आव्हान कोणते होते, याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्र यांनी 'एशियानेट न्यूज'शी बातचित करताना सांगितली.
38
मंदिराचा पाया रचण्याचे होते सर्वात मोठे आव्हान
नृपेंद्र मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीमध्ये मंदिराचा पाया रचण्याचे सर्वात मोठे आव्हान होते.
48
पाया रचण्यासाठी दोन एकर जमीन खोदली
नृपेंद्र मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मातीचे परीक्षण केल्यानंतर जो रिपोर्ट हाती आला. त्यानुसार हे स्पष्ट होते की मंदिराचा पाया रचण्यासाठी जवळपास दोन एकर क्षेत्राची संपूर्ण माती खणून काढावी लागणार आहे.
58
3 मजली इमारती इतके करण्यात आले खोदकाम
"यानंतर 15 फूट खोल म्हणजेच तीन मजली इमारतीच्या उंचीनुसार जमीन खणण्यात आली. या प्रक्रियेतील सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे पावसाळ्यापूर्वी खोदकाम पूर्ण करणे आवश्यक होते".
68
खोदकामानंतरचे मोठे आव्हान
"मंदिर परिसरात 15 मीटर अंतरावर खोदकाम केल्यानंतर येथे मोठा खड्डा तयार झाला होता. त्यामुळे ही जागा भरून काढण्याचे दुसरे मोठे आव्हान आमच्यासमोर होते".
78
इंजिनिअर सॉइलच्या मदतीने रचला मंदिराचा पाया
“मंदिराचा पाया रचण्यासाठी आम्ही इंजिनिअर सॉइल (माती)चा वापर केला. या मातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे खडकात रुपांतर होते”.
88
पाया मजबूत रचला गेला आहे का? याचेही परीक्षण
“इंजिनिअर सॉइलच्या मदतीने पाया रचण्यात आल्यानंतर मंदिराचा पाया किती मजबूत आहे? याचेही परीक्षण करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये कन्स्ट्रक्शन एजन्सी एल अँड टी आणि प्रोजेक्ट मॉनिटरिंग टाटा कन्सल्टंटच्या इंजिनिअर्सनी मदत केली”.