अभिनेत्री करिष्मा कपूरचा तिचा पती संजय कपूरशी घटस्फोट झाला होता. त्याच्या नावावर असणाऱ्या ३०,००० कोटींच्या संपत्तीची चर्चा मृत्यूनंतर ६ महिन्यांनी सुरु झाली आहे. आज पाऊस संमिश्र राहणार असून काही ठिकाणी मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

10:52 PM (IST) Jul 29
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत, ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रोख बक्षिसे दिली जातील.
10:33 PM (IST) Jul 29
Umed Mall : महाराष्ट्र सरकारने महिला बचत गटांसाठी 'उमेद मॉल' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २०० कोटी रुपयांच्या निधीतून १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल उभारले जातील, ज्यामुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळेल.
10:08 PM (IST) Jul 29
Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबने स्पोर्ट्स ट्रेनी पदांसाठी ५४ जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
09:05 PM (IST) Jul 29
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधकांवर टीका केली. त्यांनी २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुकारलेल्या ऑपरेशन सिंदुरवर टिका करणार्यांचा समाचार घेतला.
07:40 PM (IST) Jul 29
शैलेश जेजुरीकर २०२६ मध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. १९८९ मध्ये P&G मध्ये भारतात सहाय्यक ब्रँड मॅनेजर म्हणून सुरुवात करणाऱ्या जेजुरीकर यांनी विविध पदांवर काम करत कंपनीत प्रगती केली आहे.
07:19 PM (IST) Jul 29
तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी उसळी आली. रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेच्या नेतृत्वाखाली सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मध्ये वाढ झाली.
07:13 PM (IST) Jul 29
मुंबई - भारताच्या स्वातंत्र्य दिनाला अपघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खासगी प्रतिष्ठाने, सोसायटी येथे भाषणांची तयारी सुरु झाली आहे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, निवडक ५ भाषणे.. जाणून घ्या…
06:56 PM (IST) Jul 29
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे अभिनेते त्यांच्या चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेतात. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण भारतीय चित्रपटांची लोकप्रियता प्रचंड वाढली असून, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये या भागातील कलाकारांचा मोठा वाटा आहे
06:13 PM (IST) Jul 29
05:46 PM (IST) Jul 29
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान हा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आता सितारे.. या चित्रपटासाठी असाच निर्णय घेतला आहे. हा सिनेमा आता प्रेक्षखांना चक्क YouTube वर बघायला मिळणार आहे. जाणून घ्या कसे...
05:39 PM (IST) Jul 29
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सरकारी महिला कर्मचाऱ्यांसह निवृत्त महिलांनीही योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे.
05:11 PM (IST) Jul 29
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सुरू असलेल्या सिंदूर ऑपरेशनवरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी फाळणी स्वीकारल्यामुळेच पाकिस्तान अस्तित्वात आल्याचा आरोप केला.
04:28 PM (IST) Jul 29
मुंबई : आमिर खान सामाजिक विषयांवर काम करतो. त्यावर चित्रपट बनवतो. थ्री इडियट्स, पीके, दंगल, ताजे जमीन पर आणि आता सितारे जमीन पर. त्याच्या या चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश असतो. सितारे.. मध्ये त्याने काय सामाजिक संदेश दिलाय ते जाणून घ्या...
03:58 PM (IST) Jul 29
मुंबई : आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला 'सितारे ज़मीन पर' या चित्रपटाने थिएटरमध्ये ५ आठवडे पूर्ण केले आहेत. मात्र, २००७ मधील सुपरहिट 'तारे ज़मीन पर'च्या तुलनेत हा चित्रपट किती यशस्वी ठरला? पाहूया सविस्तर विश्लेषण.
03:51 PM (IST) Jul 29
Pune IT Engineer ends life : हिंजवडी येथील २३ वर्षीय आयटी इंजिनिअरने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून, त्यात 'माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये' असे लिहिले आहे.
03:16 PM (IST) Jul 29
मुंबई : प्रिथ्वीराज सुकुमारन, इब्राहिम अली खान आणि काजोल यांचा अभिनय असलेला 'सरज़मीन' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त यश मिळवत आहे. या चित्रपटाला वाढली प्रेक्षकसंख्या लाभत आहे. जाणून घ्या आतापर्यंत किती लोकांनी हा चित्रपट बघितला..
02:23 PM (IST) Jul 29
श्रावण महिन्यात अनेकजण उपवास ठेवतात. अशातच उपवासासाठी काही सोप्या रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर जाणून घेऊया.
01:24 PM (IST) Jul 29
मुंबई - ‘सैयारा’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात कमाईचे विक्रम प्रस्थापित केले. परंतु, दुसऱ्या आठवड्यात कमाई घटल्याचे दिसून येत आहे. जाणून घ्या गेल्या ११ दिवसांमध्ये या चित्रपटाने किती कमाई केली.
11:51 AM (IST) Jul 29
मुंबई लोकलच्या माध्यमातून दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. अशातच लोकल पडून किंवा लोकलचा ट्रॅक ओलांडून जात असताना अपघात घडल्याच्या घटनाही घडतात. पण रेल्वे प्रवासात मृत्यू झालेल्यांना अद्याप रेल्वेकडून नुकसान भरपाईसाठी वाट पहावी लागतेय.
11:48 AM (IST) Jul 29
बंगळुरु - अॅमेझॉनने भारतात त्यांच्या स्मार्ट डिव्हाईस कुटुंबातील नवे उत्पादन – Echo Show 5 (3rd Gen) – अधिक सुधारित डिझाइन आणि फिचर्ससह बाजारात आणले आहे. त्यामुळे या डिव्हाईसला बाजारात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
09:39 AM (IST) Jul 29
Nag Panchami 2025 : आज देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. यानिमित्त तुमच्यावर सतत डूख धरुन राहणाऱ्या किंवा मैत्रीत टांग देणाऱ्या मित्रपरिवाराला खास मजेशीर मेसेज पाठवा.
09:33 AM (IST) Jul 29
या भीषण अपघातात १९ कावडीयांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
09:12 AM (IST) Jul 29
ही घोषणा येमेनच्या राजधानी सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर करण्यात आली. यापूर्वी स्थगित केलेल्या या मृत्युदंडाला आता औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहे.
09:05 AM (IST) Jul 29
देशभरात आज (29 जुलै) नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पण सोशल मीडियावर नागपंचमीनिमित्त काही मीम्स तुफान व्हायरल होत आहेत.
08:38 AM (IST) Jul 29
पुण्यातील खराडी येथे झालेल्या पार्टीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्याचे प्रकरण सध्या तापले आहे. यातच आता एक अपडेट समोर आले असून पोलिसांना शुक्रवारीही पार्टी केल्याचे समजल्याचे सांगितले जात आहे.
07:56 AM (IST) Jul 29
मुंबई - आज नागपंचमी आहे. या निमित्त आजचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. हे भविष्य २९.०७.२०२५ मंगळवारसाठी आहे.
07:30 AM (IST) Jul 29
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण. तुमच्या भविष्यात आज काय सांगितले आहे ते जाणून घ्या.
07:04 AM (IST) Jul 29
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत करिष्मा कपूर हिस्सा मागत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, करिष्माच्या जवळच्या व्यक्तींनी या गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. संजय कपूर यांच्या आईने त्यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली आहे.