12th July 2025 Updates : दिल्लीमधील सिलामपुरमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 3-4 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स येथे एका क्लिकवर वाचा...
10:56 PM (IST) Jul 12
Ajit Pawar Baramatikar Warning : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. माझा नातेवाईक असला तरी टायरमध्ये घालून झोडा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.
10:09 PM (IST) Jul 12
मुंबई - बेडरूममध्ये आपण अशा वस्तू ठेवतो, ज्या वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आज आपण बघणार आहोत, की बेडरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे आणि त्या तुमच्या जीवनात कोणते नकारात्मक परिणाम घडवू शकतात.
10:04 PM (IST) Jul 12
Epfo Employee Relief 2025 : कर्मचारी आता घराच्या डाउन पेमेंटसाठी PF खात्यातून 90% पैसे काढू शकतात. हा नियम तीन वर्षांपेक्षा जुन्या PF खात्यांसाठी लागू आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांना नियोजनपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.
08:47 PM (IST) Jul 12
Rohit Pawar : ईडीच्या कारवाईला रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप केला आहे. कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणात दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रानंतर त्यांनी आपली बाजू मांडली आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
07:45 PM (IST) Jul 12
भाजप नेते राहुल वाल्मिकी यांचा एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन बराच गदारोळ झाला आहे. काही महिन्यांपूर्वीही एका भाजप नेत्याचा असाच व्हिडिओ समोर आला होता.
07:26 PM (IST) Jul 12
मुंबई : अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये टेक प्रेमींसाठी जबरदस्त ऑफर्स आहेत. जर तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा अमेझॉन डिव्हाइसेस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १२-१४ जुलै पर्यंतची ही संधी अजिबात चुकवू नका. टॉप-१० बेस्ट टेक डील्स जाणून घ्या..
07:13 PM (IST) Jul 12
मुंबई - महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाड़िया सध्या बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. वीरचे वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत असते. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. त्याच्या अफेअर्सची संपूर्ण यादीच पाहा..
06:29 PM (IST) Jul 12
एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या अहवालावरून भारतीय पायलट संघाने (ALPA India) AAIB वर पक्षपाती चौकशीचा आरोप केला आहे. पायलट प्रतिनिधींना चौकशीत सामील करण्याची मागणी केली आहे.
06:00 PM (IST) Jul 12
Mhada lottery 2025 : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, वसई, सिंधुदुर्ग आणि बदलापूर येथे ५२८५ परवडणाऱ्या घरांची आणि ७७ भूखंडांची सोडत जाहीर झाली आहे. १४ जुलै २०२५ पासून अर्ज सुरू होणार असून, ३ सप्टेंबर २०२५ रोजी सोडत जाहीर होणार आहे.
04:33 PM (IST) Jul 12
Makeup Kit Under 500 : नवशिक्यांसाठी मेकअप महागडा असू शकतो, परंतु फक्त ₹५०० मध्ये एक चांगली बेसिक मेकअप किट तयार केली जाऊ शकते. ही किट तुमच्या दैनंदिन लुक आणि कॉलेज किंवा ऑफिससाठी परिपूर्ण असेल.
04:31 PM (IST) Jul 12
विशेष म्हणजे शरद पवारांनी या पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच एक निष्ठावंत, अनुभवसंपन्न चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे पक्षातील जुनी निष्ठावंत गटबांधणी जपण्यासह नव्या पिढीला दिशा देण्याचे काम शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवले आहे.
02:47 PM (IST) Jul 12
मुंबई - श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हिंदी पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात लवकर होते, तर मराठी पंचांगात श्रावण काही दिवस उशिरा सुरू होतो. असं का होतं, यामागचं शास्त्र काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
01:53 PM (IST) Jul 12
मुंबई : श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान शंकराची मोठ्या भक्ती भावाने पूजा-प्रार्थना केली जाते. याशिवाय श्रावणी सोमवारचेही या महिन्यात फार महत्व आहे. तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणत्या चुका करणे टाळाव्यात.
01:19 PM (IST) Jul 12
11:11 AM (IST) Jul 12
राज्यातील जमिनींच्या नाव नोंदणीमध्ये बदल होणार आहे. सातबाऱ्याच्या उताऱ्यावर आता जमीन क्षेत्रासह त्या जमिनीवरील पोट हिस्स्याची देखील नोंदणी केली जाणार आहे. याबद्दलची माहिती शेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
10:39 AM (IST) Jul 12
अहमदाबाद एअर इंडिया अपघाताच्या प्राथमिक अहवालात बोइंग 787 च्या फ्यूल स्विचची महत्त्वपूर्ण भूमिका समोर आली आहे. हे स्विच काय आहेत आणि कसे काम करतात? जाणून घ्या..
10:07 AM (IST) Jul 12
मुंबई : कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे. पण मुंबई, ठाणे या भागात पावासाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे.
09:55 AM (IST) Jul 12
शनि शिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्त मंडळाने मोठा आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण समोर आले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
09:40 AM (IST) Jul 12
'स्नॅपड्रॅगन फॉर इंडिया' उपक्रमाअंतर्गत क्वालकॉम भारतात टेक्नॉलॉजी इनोव्हेशनची नवी सुरवात करत आहे. २१ जुलै २०२५ रोजी XR डे पासून याची सुरुवात होईल, जिथे AR, VR आणि MR टेक्नॉलॉजीचा प्रत्यक्ष वापर आणि भविष्यातील शक्यता सादर केल्या जातील.
09:02 AM (IST) Jul 12
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन एक महिना उलटून गेला. पण अजूनही या अपघातातून नागरिक बाहेर पडलेले नाहीत. १२ जूनला अहमदाबादहून उड्डाण केलेल्या बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमानाला अपघात झाला आणि त्यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. विमानातील केवळ १ प्रवासी वाचला. बाकीच्या २४१ जणांनी अपघातात जीव गमावला. भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागानं (एएआयबी) या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली.
09:02 AM (IST) Jul 12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावे, असा संकेत देणारे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी दिवंगत संघनेते मोरोपंत पिंगळे यांचे उद्गार उद्धृत करताना म्हटले की, "75 वर्षांची शाल पांघरली म्हणजे थोडे बाजूला व्हावे," यावरून अनेकांनी याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वयानं जोडला.
09:00 AM (IST) Jul 12
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली गेल्याची दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून 3-4 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.