10th July 2025 Updates : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, अनेक रस्ते आणि गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर शहरात 24 तासांत विक्रमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. अशा काही देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींचा आढावा एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर घ्या.

10:08 PM (IST) Jul 10
07:37 PM (IST) Jul 10
06:49 PM (IST) Jul 10
06:12 PM (IST) Jul 10
सीपीआर टिप्स : व्यक्ती अचानक बेशुद्ध झाल्यास ताबडतोब सीपीआर द्यावे. जर तुम्ही पहिल्यांदाच सीपीआर देणार असाल तर सीपीआर देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घ्या.
04:50 PM (IST) Jul 10
02:19 PM (IST) Jul 10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रेतील भाविकांचा उत्साह कायम आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत आतापर्यंत लाखो भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.
01:55 PM (IST) Jul 10
संपूर्ण मुंबईभर मोठा मोर्चा काढून या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता मंदिराच्या पाडकामावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
01:13 PM (IST) Jul 10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित पुस्ताकाचे प्रकाशन आज झाले. यावेळी मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
12:24 PM (IST) Jul 10
मुंबईतील कर्नाक पुलाचे अखेर नामांतर करत सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यानंतर मीडियासोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिंदूर नाव ठेवण्यामागील खास कारण सांगितले आहे.
11:33 AM (IST) Jul 10
मुंबई : मुंबई व परिसरात पावसाची उघडीप असली तरी वातावरण दमट आणि ढगाळ राहणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात पुन्हा बदल होऊ शकतो. जाणून घेऊया हवामान खात्याचा आजचा अंदाज…
09:54 AM (IST) Jul 10
दिल्ली-एनसीआरमध्ये भूंकपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 04 मिनिटांनी नागरिकांना भूकंपाचे धक्के अनुभवले. 4.4 रिश्टर स्केल एवढे धक्के होते.
09:24 AM (IST) Jul 10
Shirdi Sai Baba Temple Guru Purnima 2025 : गुरू पौर्णिमेच्या पर्वावर, 9 ते 11 जुलै दरम्यान मंदिरात तीन दिवसांच्या सत्संग आणि पूजा विधांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात.
09:16 AM (IST) Jul 10
मुंबई : गुरुपौर्णिमा १० जुलैला साजरी केली जाणार आहे. आपल्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करून त्यांचे आभार माना. त्यांना खास शुभेच्छापत्रे, मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून त्यांना वंदन करा. त्यांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा.
09:14 AM (IST) Jul 10
गुरु पूर्णिमा दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते. हा दिवस गुरु-शिष्य परंपरेला समर्पित आहे. गुरुंचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. जाणून घ्या यावेळी गुरु पूर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्तसह संपूर्ण माहिती.
09:12 AM (IST) Jul 10
गुरु पौर्णिमा २०२५: यंदा गुरु पौर्णिमा १० जुलै, गुरुवारी साजरी केली जाईल. हा सण दरवर्षी आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो, पण हा सण का साजरा करतात हे फार कमी लोकांना माहीत आहे.
09:11 AM (IST) Jul 10
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रत्येक क्रमांकाला आज अनुरुप दिवस आहे, की काही संकटे येतील ते जाणून घ्या. हे उपाय करुन आयुष्याती संकटे दूर करा.
09:10 AM (IST) Jul 10
मुंबई : आज गुरुपौर्णिमेचा सण आहे. या दिवशी गुरुकडून आशिर्वाद रुपी फळ मिळते. गुरुच्या आशिर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदेल. पुढील स्लाईडवर वाचा तुमचे भविष्य. अखेरच्या स्लाईडवर आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, राहुकाल और अभिजीत मुहूर्त…
08:47 AM (IST) Jul 10
कळमेश्वर येथील बोरगाव उगले परिसरात १८ वर्षीय कार्तिक शिवशंकर लाडसे हा युवक बुधवारी पहाटे गावातील नाला पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. शोधमोहीमीनंतर त्याचा मृतदेह सापडला. तसेच सावनेरमधील बोरगाव बुजुर्ग येथे अनिल हनुमंत पानपत्ते (३५) हे नाला पार करताना वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.