सार
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी पराक्रम, धोरण आणि कुशल प्रशासनासोबतच गुप्तहेर यंत्रणेचाही प्रभावीपणे वापर केला. बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील गुप्तहेरांनी शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणेच काम केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी पराक्रम, धोरण आणि कुशल प्रशासनाचा आधार घेतला. त्यांच्यासाठी जितके महत्त्व तलवारीला होते, तितकेच महत्त्व गुप्तहेर यंत्रणेलाही होते. शिवरायांच्या काळातील गुप्तहेर हे स्वराज्याच्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत असत.
स्वराज्याचे गुप्तहेर आणि त्यांचे कार्य शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक यांना आपल्या गुप्तहेर दलाचे प्रमुख बनवले. ते महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि कुशल गुप्तचर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत आणि अत्यंत सक्षम गुप्तहेर नेटवर्क तयार करण्यात आले.
बहिर्जी नाईक –
छुपा योद्धा बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख होते. ते विविध स्वरूपाच्या वेषभूषा करून शत्रूच्या गडांवर आणि छावण्यांमध्ये जाऊन गुप्त माहिती मिळवायचे. अफगाणी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मुघल यांच्यात काय चालले आहे, यावर ते सतत लक्ष ठेवत.
गुप्तहेरांचे प्रमुख कार्य:
शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे – मुघल, आदिलशाही, इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या हालचालींची माहिती गुप्तपणे आणणे.
गडांची माहिती मिळवणे – कोणत्या गडावर किती सैन्य आहे, कोणत्या ठिकाणी शत्रूचे कमकुवत ठिकाण आहे, याचा अहवाल तयार करणे.
युद्धनीती आखण्यासाठी मदत – संभाजी महाराजांना व महाराजांच्या सेनापतींना योग्य वेळी योग्य माहिती पुरवणे.
धोके आणि कट रोखणे – स्वराज्यावर होणाऱ्या हल्ल्यांची माहिती आधीच मिळवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे.
गुप्त संचार यंत्रणा तयार करणे – कोड लँग्वेज, विशिष्ट संदेश प्रणाली आणि वेगवेगळ्या खुणा वापरून संदेश पोहोचवणे.
बहिर्जी नाईक यांची महान कामगिरी
- पुरंदर किल्ला हस्तगत करण्याआधी त्यांनी शत्रूंची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यानुसार महाराजांनी रणनीती आखली.
- सिंहगड मोहिमेपूर्वी तानाजी मालुसरे यांना त्यांनी किल्ल्यावरच्या सुरक्षेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पुरवली.
- अफझलखान वधाच्या वेळी त्यांच्या गुप्तहेरांनी खानाच्या छावणीतील योजना उघड केल्या, ज्यामुळे शिवरायांना योग्य रणनीती आखता आली.