सार

आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज आहे.घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त अशा आहार टीप्स सांगितल्या आहेत. 

आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज आहे.घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त अशा आहार टीप्स सांगितल्या आहेत.

हेल्दी आहार म्हणजे काय ?

ज्या आहरातून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळतात त्या आहाराला ‘हेल्दी आहार’ असे म्हणतात. यालाच संतुलित आहार किंवा पौष्टिक आहार असेही म्हणतात. हेल्दी आहारात कर्बोदके, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि क्षार या पोषक घटकांचा समतोल राखलेला असतो.

आपल्याला निरोगी राहण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कॅलरी आणि विविध पोषकतत्वांची आवश्यकता असते. हेल्दी आहार घेतल्यास हेल्दी राहता येते. जंकफूड, फास्टफूड यासारखा आहार घेतल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी प्रत्येकाने हेल्दी आहाराला प्राधान्य दिले पाहिजे.

हेल्दी राहण्यासाठी काय खावे ..?

हेल्दी राहण्यासाठी पोषकघटकांनी परिपूर्ण आणि संतुलित असा आहार घ्यावा. यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या, शेंगभाज्या, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश करा. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. याशिवाय ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी असे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.

हेल्दी राहण्यासाठी काय खाऊ नये ?

चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळले पाहिजे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. चहा, कॉफी यांचे प्रमाणही कमी करावे. तसेच धुम्रपान, मद्यपान, तंबाखू अशा व्यसनांपासून दूर राहावे.सॅच्युरेटेड फॅट्स असणारे पामतेल, नारियल तेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक हे पदार्थ खाणे कमी करावे. सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते. यांमुळे हृद्यविकार, उच्च रक्तदाब, धमनीकाठिन्यतः, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या समस्या उत्पन्न होतात. तसेच ट्रांस फॅट्स असणारे वनस्पती तूप यासारखे पदार्थ खाणे टाळावे.