अल्पवयीन मुलींवरील बलात्कार झाल्यास या देशात दिली जाते 'फाशी'ची शिक्षा; भारतातील कायदा काय सांगतो ?

| Published : May 06 2024, 04:57 PM IST

court hammer  01.jpg
अल्पवयीन मुलींवरील बलात्कार झाल्यास या देशात दिली जाते 'फाशी'ची शिक्षा; भारतातील कायदा काय सांगतो ?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

देशात सध्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मुंबई, अकोला किंवा दिल्ली, यामध्ये तारीख आणि ठिकाण वेगवेगळी आहेत पण घटनांचा पॅटर्न सारखा आरोपी वेगळे फक्त.अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास काय कायदा आहे? जाणून घ्या

देशात सध्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मुंबई, अकोला किंवा दिल्ली, यामध्ये फक्त तारीख आणि ठिकाण वेगवेगळी आहेत पण घटनांचा पॅटर्न सारखा, आरोपी वेगळे फक्त. तसेच यातून सगळे आरोपी दोषीच सिद्ध झाले आहेत. वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे आरोपीना चाप बसने गरजेचे आहे. त्यासाठी भारतात अनेक वेळा मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या की, आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे अशा मागण्या होतात. पण खरच भारतात फाशीची शिक्षा दिली जाते का ? अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास काय कायदा आहे? जाणून घ्या

भारतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास कायद्यात काय तरतूद :

भारतात शक्यतोर दहशतवाद्याला किंवा खूप मोठा गुन्हा त्या व्यक्तीने केला असेल तर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते.त्यामुळे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा गुन्हा 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद,  जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. मात्र हा कायदा काही राज्यांमध्ये अपवाद आहे, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याचं विधेयक पारित करण्यात आलं आहे. तसेच मोदी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा देखील संमत केलं असून तो लवकरच अंमलात आणला जाणार आहे.

जगभरातील विविध देशात काय शिक्षा?

बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जगभरात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. अनेक देशांमध्ये बलात्कारापेक्षा बाल लैंगिक शोषण हा अधिक मोठा गुन्हा समजला जातो.

मलेशिया : मलेशियामध्ये बाल लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षांची कैद आणि कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते.

सिंगापूर : सिंगापूरमध्ये चौदा वर्षांच्या बालकावर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला 20 वर्षं तुरुंगवास भोगावा लागतो. शिवाय कोडे मारण्याची आणि दंड भरण्याची शिक्षाही मिळू शकते.

अमेरिका : अमेरिकेत लहान मुलांवर झालेल्य बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद होती. पण 2008मध्ये बलात्काराच्या एका घटनेवरील सुनावणीत फाशीची शिक्षा बेकायदेशीर असल्याचं नमूद केलं गेलं. कोर्टाने म्हटलं की, घटनेत मृत्यू झालेला नसल्याने त्यातील गुन्ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा देणं म्हणजे गुन्ह्यापेक्षा शिक्षा मोठी ठरते. त्यामुळे आता तिथे बलात्काराच्या घटनेत फाशीची शिक्षा दिली जात नाही. अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी कायद्यात शिक्षेच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत.

अत्यंत कठोर शिक्षा सुनावणारे देश कोणते ?

फिलिपाईन्स : लहान मुलांवरील बलात्कार केल्यास सर्वात कठोर कायदे फिलिपाईन्समध्ये आहेत. अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला 40 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.तसेच शिक्षेदरम्यान पॅरोलही मिळत नाही.

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियात अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

इंग्लंड : इंग्लंडमध्ये अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्याचं सिद्ध झाल्यास 6 वर्षांपासून ते 19 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा जन्मठेपही होऊ शकते.

जर्मनी : जर्मनीत बलात्कारानंतर मृत्यू किंवा हत्या झाल्यास गुन्हेगार व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होते. तर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 10 वर्ष शिक्षा सुनावली जाते.

दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेत बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्या वेळेस 15 वर्षं, तर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 20 वर्षं आणि तिसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या देशात फाशीची तरतूद :

लहान मुलांसंबंधी गुन्ह्यांसाठी जगभरात फक्त 8 देशांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये चीन, नायजेरिया, कांगो, पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, यमन आणि सुदान या देशांचा समावेश आहे.