Health tips : उन्हाळ्यात ऍसिडिटीचा त्रास होतोय ? मग हे नक्की करून पहा

| Published : Apr 22 2024, 06:47 PM IST

acidity

सार

अनेकांना उन्हाळ्यात ऍसिडिटीचा त्रास भयंकर होतो. रोजच छातीत जळजळ होणे. त्यातून अनेक विकार वाढू शकता. हे टाळण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत ते प्रत्येकाने नक्की ट्राय केले पाहिजे. जेणे करून तुमच्या ऍसिडिटीची समस्या नियंत्रणात येईल. 

अनेकांना उन्हाळ्यात ऍसिडिटीचा त्रास भयंकर होतो. रोजच छातीत जळजळ होणे. त्यातून अनेक विकार वाढू शकता. हे टाळण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत ते प्रत्येकाने नक्की ट्राय केले पाहिजे. जेणे करून तुमच्या ऍसिडिटीची समस्या नियंत्रणात येईल आणि कोणत्याही व्याधी तुमच्या मागे लागणार नाही. जाणून घ्या ऍसिडिटीची लक्षणे, ते रोखण्यासाठी काय उपाय करावे आणि काय करू नये.

ऍसिडिटीची लक्षणे :

पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटी झाल्यास छातीमध्ये, पोटामध्ये किंवा घशात जळजळणे, आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी सुटणे, मळमळ, डोकेदुखी, मायग्रेन डोकेदुखी अशी लक्षणे जाणवू शकतात.

ऍसिडिटी होण्याची कारणे :

  • मसालेदार, तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, कोल्ड्रिंक्स, चहा-कॉफी अधिक पिण्यामुळे
  • पोट खूप वेळ रिकामे ठेवणे
  • जेवणाच्या वेळा न पाळणे या सवयीमुळे 
  • धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे 
  • मानसिक ताणतणाव
  • जागरण केल्यामुळे
  • डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे 

ऍसिडिटी वर हे करा घरगुती उपाय :

आले :  ऍसिडिटी झाल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

थंड दूध : थंड दूध पिण्यामुळेही ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. याशिवाय मनुका दुधात घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात.

केळे : केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे ऍसिडिटीवर केळे खाल्याने आराम मिळतो.

बडीशेप : जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे ऍसिडिटी होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.

तुळशीची पाने : अॅसिडिटी होत असल्यास तुळशीची काही पाने चावून खावीत.