बांग्लादेशात हिंसाचाराचा भडका, अवामी लीगच्या 20 नेत्यांची हत्या; हिंदुंवर हल्ले

Published : Aug 07, 2024, 11:21 AM ISTUpdated : Aug 07, 2024, 11:29 AM IST
BANGLADESH

सार

बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हिंसाचार उसळला असून अनेक ठिकाणी दंगली पेटल्या आहेत. अवामी लीगच्या २० नेत्यांची हत्या करण्यात आली असून पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. 

बांग्लादेशमध्ये अजूनही हिंसाचार सुरु आहे. तिथून चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या विरोधातून उभ्या राहिलेल्या आंदोलनामध्ये आज देश जळत आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही हिंसाचार सुरु आहे. एक धक्कादायक घटना घडली आहे. शेख हसीन यांच्या अवामी लीग पार्टीच्या 20 नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या अवामी लीगच्या नेत्यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अवामी लीगच्या 20 नेत्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरात आणि दुकानांमध्ये तोडफोड, जाळपोळ सुरु आहे.

बांग्लादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला

बांग्लादेशच्या सतखिरा येथे झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला. कुमिलामध्ये 11 लोकांना ठार मारण्यात आले आहे. बांग्लादेशचे माजी काउन्सिलर मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला दंगलखोरांनी आग लावली. यात सहाजणांचा मृत्यू झाला. बांग्लादेशातील प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचे ढाका धानमंडी येथील 140 वर्ष जुन घरं समाजकंटकांनी जाळलं. आनंदच हे घर जिवंत सांस्कृतिक केंद्र होते. दंगलखोरांनी हे घर जाळण्याआधी तिथे लुटमार केली.

भारतात येण्यासाठी निघालेल्या मंत्र्याला विमानतळावरच अटक

शेख हसीना देश सोडून पळाल्या. आता त्यांच्या पक्षाचे नेते, मंत्री यांना लक्ष्य करण्यात येतय. बांग्लादेशचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका एयरपोर्टवरुन ताब्यात घेण्यात आले. ते भारतात येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अटक झाली. बांग्लादेशात सत्तापालट होण्याआधी शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री देशाबाहेर पळाले होते. अवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते परिवहन मंत्री अब्दुल क्वादर रविवारी रात्रीच देशाबाहेर निघून गेले. हसीना सरकारमध्ये मंत्री राहिलेले अनिसुल हक देशसोडून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

जो पर्यंत पोलिसांची सुरक्षा निश्चित होत नाही, तो पर्यंत पोलिसांचा संप

सत्तापालटानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. देशाच्या 27 जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले झाले आहेत. उपद्रवी मंदिरांना सुद्धा लक्ष्य करत आहेत. बांग्लादेश पोलीस सर्विस असोसिएशनने (BPSA) मंगळवारी संपाची घोषणा केली. जो पर्यंत पोलिसांची सुरक्षा निश्चित होत नाही, तो पर्यंत आम्ही संपावर आहोत. सोमवारी बांग्लादेशात 400 पेक्षा अधिक पोलीस स्टेशन्सवर हल्ला झाला. यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा :

Bangladesh Crisis Live: खालिदा झिया यांचा मुलगा लंडनहून मायदेशी का आला?

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर