हिवाळ्यातील सांधेदुखी कशी टाळावी?
१. व्यायाम करा: हिवाळ्यात सांधेदुखी होऊ नये म्हणून दररोज व्यायाम करा. यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. घरीच योगासने, छोटे छोटे व्यायाम करा. असे केल्याने सांधेदुखी कमी होईल.
२. कोमट पाण्याने आंघोळ करा: हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या कमी करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्याने आंघोळ केल्यास समस्या आणखी वाढेल.
३. हिवाळ्यातील कपडे घाला: हिवाळ्यात थंड हवेमुळे सांधेदुखी होते. म्हणून तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यातील कपडे घाला. विशेषतः ज्यांना आधीच सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात खूप काळजी घ्यावी.