प्लास्टिक थोडेसे गरम झाल्यावर त्यातून धोकादायक रसायने बाहेर पडतात. गरम पदार्थ पॅक करतानाही अशीच परिस्थिती निर्माण होते. प्लास्टिकऐवजी काचेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे डबे वापरण्याची आरोग्य तज्ज्ञांची शिफारस आहे.
प्लास्टिकच्या डब्यातून जेवल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, असे नवीन अभ्यासातून समोर आले आहे. जेवण ऑर्डर करणे असो की सुपरमार्केटमधून किराणा सामान आणणे असो, सर्व काही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये येते. मानवी शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात असे अनेक अहवाल असूनही, प्लास्टिकच्या डब्यातून जेवणे सामान्य झाले आहे.
प्लास्टिकच्या डब्यातून जेवल्याने आतड्यातील बायोममध्ये बदल होऊन जळजळ, रक्ताभिसरणातील बिघाड यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे अभ्यासात म्हटले आहे. सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
प्लास्टिकचे जेवणाचे डबे आणि हृदयरोग यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी संशोधकांनी ३,००० हून अधिक चिनी लोकांचा डेटा तपासला आणि उंदरांवर प्रयोग केले. सूक्ष्म प्लास्टिक अन्नात मिसळून आतड्यात जातात आणि आतड्याच्या अस्तराचे नुकसान करतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
अभ्यासात चिनी लोकांचा प्लास्टिकच्या डब्यांचा वापर आणि त्यांची हृदयरोगाची स्थिती तपासण्यात आली. तसेच, उकळत्या पाण्यात प्लास्टिकचे डबे टाकून ते पाणी उंदरांना पाजण्यात आले. प्लास्टिकचा अतिवापर हृदयविकाराच्या धोक्याशी संबंधित आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
प्लास्टिक थोडेसे गरम झाल्यावर त्यातून धोकादायक रसायने बाहेर पडतात. गरम पदार्थ पॅक करतानाही अशीच परिस्थिती निर्माण होते. प्लास्टिकऐवजी काचेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे डबे वापरण्याची आरोग्य तज्ज्ञांची शिफारस आहे. प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करू नका, असेही ते म्हणतात.