MPSCProtest | MPSC परीक्षेवर सुषमा अंधारेंची फेरपरीक्षेची मागणी

MPSCProtest | MPSC परीक्षेवर सुषमा अंधारेंची फेरपरीक्षेची मागणी

Published : Oct 15, 2026, 06:05 PM IST

पुण्यात सुषमा अंधारे यांनी माथाडी कामगार निरीक्षक भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर प्रश्न उपस्थित केले. नागपूरच्या एकाच केंद्रातील 24 विद्यार्थी टॉपर ठरणं, अभ्यासक्रमाबाहेरील 24 प्रश्न, निकाल प्रसिद्ध करण्याची पद्धत आणि रॉ स्कोअर जाहीर न केल्यावरून परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली. SIR विरोधी आंदोलनावर बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. CJP आंदोलकांच्या अटकेवर टीका करत जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला. आदित्य ठाकरेंच्या व्हायरल फोटोवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य करत महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे भाजपचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असं म्हटलं.