दुसऱ्या देशात वाहन चालवायचे असेल तर त्या देशाचे लायसन्स लागते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. हो, लागतेच. पण काही देश भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारतात. काही देशांमध्ये काही अटी असतात, तर काही देशांमध्ये कोणत्याही अटी नसतात. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारणाऱ्या देशांची यादी पाहूया.
१) न्यूझीलंड
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर न्यूझीलंडमध्ये वाहन चालवता येते. पण काही अटी आहेत. एक वर्षापर्यंतच भारतीय लायसन्स वापरता येते. वाहन चालवणाऱ्याचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असायला हवे. इंग्रजीमधील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
२) ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय लायसन्स काही अटींनुसार स्वीकारले जाते. इंग्रजीमधील भारतीय लायसन्स असणाऱ्यांना न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड, साउथ ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी या ठिकाणी वाहन चालवता येते.
३) सिंगापूर
सिंगापूरमध्ये साधारणपणे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स लागते. पण इंग्रजीमधील भारतीय लायसन्स असेल तर एक वर्षापर्यंत वाहन चालवता येते.
४) दक्षिण आफ्रिका
भारतीय लायसन्स स्वीकारणारा आणखी एक देश म्हणजे दक्षिण आफ्रिका. इंग्रजीमधील भारतीय लायसन्सवर दक्षिण आफ्रिकेचा प्रवास करता येतो.
५) युनायटेड किंग्डम (यूके)
यूकेमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर एक वर्ष वाहन चालवता येते. पण लायसन्सवर नमूद केलेल्या वाहनांच्या प्रकारांपुरतेच चालवता येते.
६) स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंडमध्येही भारतीय लायसन्सवर एक वर्ष वाहन चालवता येते. इंग्रजीमधील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत असेल तर गाडी भाड्यानेही घेता येते.
७) स्वीडन
स्वीडनमध्येही भारतीय लायसन्स चालते. पण ते स्वीडिश, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन किंवा नॉर्वेजियन भाषेत असायला हवे.
८) स्पेन
स्पेनमध्ये राहण्याची नोंदणी केल्यानंतर भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर प्रवास करता येतो. काहीवेळा ओळखपत्र दाखवावे लागू शकते.