
SIR विरोधी आंदोलनाच्या पत्रकार परिषदेत नेहा बोरा यांनी पत्रकारांना मारहाण, कॅमेरे जप्त करणे, महिला पत्रकाराचा छळ आणि आंदोलकांच्या अटकेवरून पोलिसांवर आरोप केले. मतदानाचा हक्क वाचवण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. CJP चे अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी मोदी-शहा सरकारने दिल्लीतील रेल्वे, मेट्रो बंद केल्याचा आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला. 13 कोटी मतदारांची नावं वगळल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले. आंदोलकांवर कारवाई करायचीच असेल तर अधिकृत आणीबाणी जाहीर करा, असं मोदींना आव्हान दिलं.