25th July 2025 Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव्सच्या दौऱ्यावर आहेत. याशिवाय गाझीयाबादमध्ये डिलिव्हरी बॉयच्या रुपात आलेल्या तरुणांनी ज्वेलरीचे दुकान लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. अशाच ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर वाचा...

09:34 PM (IST) Jul 25
08:54 PM (IST) Jul 25
मुंबई : पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सहाजिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठीही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
07:53 PM (IST) Jul 25
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्रिमंडळ फेरबदलावर भाष्य करत स्पष्ट केले की मंत्र्यांची नियुक्ती हा पक्षाचा निर्णय आहे. अध्यक्षांची भूमिका यात नसल्याचे त्यांनी सांगितले.
07:13 PM (IST) Jul 25
पालघर - पालघर जिल्ह्यात उद्या शनिवार, २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी ही माहिती दिली आहे.
06:51 PM (IST) Jul 25
मुंबई - प्राइम व्हिडिओवर चित्रपट रेंटने कसे घ्यायचे? रेंटने उपलब्ध असलेले चित्रपट कोणते? यासारखी इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
05:11 PM (IST) Jul 25
नवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास स्पष्टपणे दिसून येत असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाचे प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून ₹1,14,710 इतके झाले आहे. ही माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात दिली आहे.
04:18 PM (IST) Jul 25
मुंबई - देशभक्तीपर चित्रपटांपासून ते कोरियन क्रीडा कथांपर्यंत, या आठवड्यातील OTT मालिकेत थरारक रहस्ये, मनाला भिडणार्या कथा आणि खळखळून हसायला लावणारे विनोद आहेत. आज आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत 5 रोमांचक नवीन रिलीज, तुम्हाला नक्कीच पाहायला आवडतील!
04:03 PM (IST) Jul 25
प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्यातील अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली होती, ज्यामुळे अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला.
03:03 PM (IST) Jul 25
Shravan 2025 : आजपासून श्रावणाला सुरुवात झाली असून यावेळी श्रावणी शनिवार आणि सोमवारला फार महत्व असते. अशातच शनिवारी उपवास असल्यास राजगिऱ्याचे थालीपीठ तयार करू शकता. याचीच सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
12:05 PM (IST) Jul 25
राजस्थानमधील झालावाड येथे आज सकाळी शाळेची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
11:41 AM (IST) Jul 25
मुंबई : 'वॉर २' चित्रपटामुळे ऋतिक रोशन आणि Jr NTR चर्चेत आले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. दोघांच्याही टॉप ५ हिट चित्रपटांची ही यादी.
11:39 AM (IST) Jul 25
बुलढाण्यात एका शेतकरी दाम्पत्याने एकाच दोरीने गळफास लावून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. यामागील नक्की कारण स्पष्ट झालेले नाही.
11:19 AM (IST) Jul 25
वॉर 2 मध्ये ऋतिक रोशन पुन्हा एकदा 'कबीर' या आपल्या गुप्तहेर भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी त्याच्यासमोर आहे एक नवा आणि प्रचंड ताकदवान शत्रू एनटीआर ज्याने या सिनेमात एका धोकादायक पण भावनिक पात्राची भूमिका साकारली आहे.
11:06 AM (IST) Jul 25
महादायी योजनेबाबत गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना माहिती नाही. ते मानसिक संतुलन गमावून बोलत आहेत, असा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे.
10:56 AM (IST) Jul 25
गुरुवारी मुंबई-मस्कत एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका थाई महिलेने ३०,००० फूट उंचीवर बाळाला जन्म दिला. विमानात कोणतेही वैद्यकीय व्यावसायिक नसल्याने केबिन क्रूने प्रसूतीमध्ये मदत केली.
10:13 AM (IST) Jul 25
कोल्हापूरमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणांकडून 18 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
09:46 AM (IST) Jul 25
मुंबई - नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' या रोमँटिक म्युझिकल ड्रामाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
09:35 AM (IST) Jul 25
सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, “१८ वर्षे ही वयोमर्यादा अनेक कायद्यांमध्ये ठरवून दिली गेली आहे. ती मुलांच्या शरीरिक स्वातंत्र्याचे रक्षण करते. त्यामुळे यामध्ये कोणताही बदल कोर्टाने करू नये.”
09:05 AM (IST) Jul 25
केतकी चितळे ही मराठी अभिनेत्री आपल्या अभिनयापेक्षा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अधिक चर्चेत असते. यापूर्वीही तिच्या विविध पोस्ट्समुळे ती टीकेच्या केंद्रस्थानी राहिली आहे.
08:40 AM (IST) Jul 25
मुंबईसह कोकणातील भागात पुढील 24 तासात पावसाचा जोर अधिक वाढून अतिमुसळधार पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवण्यात आली आहे. अशातच नागरिकांसाठी हायअलर्ट जारी केला आहे.
08:33 AM (IST) Jul 25
मुंबई- श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम काळ. या श्रावण महिन्यात त्यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. चला पाहूया २०२५ च्या श्रावण महिन्यात महादेव १२ राशींवर कशी कृपा करतील..