18th July 2025 Updates : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या कारचा जम्मू-काश्मीरजवळील उधमपूर जिल्ह्यात अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले असून अन्य बाकींची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय कर्नाटकातील उडपी येथे मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या गटामध्ये झालेल्या वादामुळे राजकरण चांगलेच तापले आहे.अशाच ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर जाणून घ्या…

07:23 PM (IST) Jul 18
हैदराबादला आधीच आऊटर रिंगरोड आहे. आता आणखी एक आऊटर रिंग रोड (ओआरआर) बांधण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर आता आऊटर रिंगरेल्वेचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेजारचे जिल्हे जोडले जाणार आहेत.
06:41 PM (IST) Jul 18
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर चिंता आणि कौतुक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
05:37 PM (IST) Jul 18
मुंबई- सोन्याचे दागिने म्हटले की सर्वात जास्त मागणी असते ती इअररिंग्सला. कारण कोणताही लूक पूर्ण करण्यासाठी सुंदर झुमके किंवा स्टड्सची जोड अत्यावश्यक ठरते. यामध्येही ४ ग्रॅम वजनाचे इअररिंग्स हे खास लोकप्रिय आहेत.
05:11 PM (IST) Jul 18
“आमदारांचे आचरण आदर्शवत असावे आणि लोकशाहीच्या मंदिरात योग्य वागणूक अपेक्षित आहे. यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पावले उचलणार आहोत,” असे नार्वेकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
04:49 PM (IST) Jul 18
कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावात ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा निर्घृण खून झाला आहे. त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत कर्नाटकातील हिरण्यकेशी नदीत सापडला आहे.
02:30 PM (IST) Jul 18
बहुतांश महिलांना पैठणी साडी नेसणे फार आवडते. पण एखाद्या जुन्या पैठणी साडीला तुम्ही नवा लूक देऊ शकता. सध्या पैठणीपासून इंडो-वेस्टर्न ड्रेस शिवण्याचा ट्रेन्ड आहे.
01:51 PM (IST) Jul 18
सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे केवळ प्रवाशांचा जीव वाचणार नाही, तर मुंबईसारख्या गतिशील शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास मिळू शकतो.
12:55 PM (IST) Jul 18
या हाणामारीचा केंद्रबिंदू असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपली बाजू नम्रपणे मांडली असली, तरी यामागे विरोधकांनी भाजपवर ‘हनीट्रॅप प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव’ असल्याचा आरोप केला आहे.
11:39 AM (IST) Jul 18
रिलायन्स आणि केल्विनेटर हे दोन्ही विश्वासार्ह ब्रांड आहेत. केल्विनेटरला टेक ओव्हर केल्याने रिलायन्स हा ब्रांड अधिक मजबूत होताना दिसून येईल. याचा फायदा अधिक मार्केट कॅप्टर करण्यासाठी होईल.
11:30 AM (IST) Jul 18
विधीमंडळाच्या लॉबीमध्ये गुरुवारी (18 जुलै) जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. याचेच प्रतिसाद आता उमटत असून राजकरण तापले आहे.
11:10 AM (IST) Jul 18
कोल्डप्लेच्या एका कॉन्सर्टमधील व्हायरल क्लिपमध्ये सीईओ अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबॉट यांच्यातील जवळीक दिसून येत आहे. ख्रिस मार्टिनच्या स्टेजवरील टिप्पणीनंतर या दोघांमधील प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत.
10:27 AM (IST) Jul 18
मुंबईतील वांद्रे परिसरात पहाटेच्या वेळेस तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
09:44 AM (IST) Jul 18
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर राजकरण तापले आहे. अशातच आव्हाड यांच्या मुलीला देखील खालच्या स्तरावर ट्रोल करण्यात आले. यावरुनच नताशा आव्हाडने सोशल मीडियावर संतप्त शब्दांत एक पोस्ट शेअर केली आहे.
09:30 AM (IST) Jul 18
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमिवर जाणून घ्या, गोपिचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि इतर घटना.
08:28 AM (IST) Jul 18
विधीमंडळाच्या आवारात गुरुवारी (17 जुलै) जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
08:09 AM (IST) Jul 18
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या कारचा जम्मू-काश्मीरजवळील उधमपूर जिल्ह्यात अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले असून अन्य बाकींची प्रकृती स्थिर आहे.