'गदर', 'धूम-2' सिनेमा नव्हे या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केलीय सर्वाधिक कमाई

भारतात प्रत्येक वर्षी एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे प्रदर्शित होतात. बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या सिनेमांचा नेहमीच बोलबाला राहतो हे तुम्हालाही माहिती असेल. पण भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा कोणताय हे माहितेय का?

Chanda Mandavkar | Published : Jan 12, 2024 9:30 AM IST / Updated: Jan 12 2024, 03:03 PM IST
17
भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

भारतात प्रदर्शित होणारे काही सिनेमे बजेटपेक्षा दुप्पट कमाई करतील असा अंदाज लावला जातो. काहीवेळेस सिनेमाची अपेक्षेपेक्षा अधिक कमाई होत नाही. पण मराठीतील सिनेमा 'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर 26 पट अधिक नफा कमावला आहे.

27
सैराट सिनेमा

वर्ष 2016 मध्ये नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बक्कळ कमाई केली होती. याशिवाय सिनेमा प्रेक्षकांच्या फार पसंतीस पडला होता.

37
4 कोटी रूपयांत बनवला होता सैराट सिनेमा

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ सिनेमा केवळ 4 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार केला होता. पण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने 110 कोटी रूपयांची कमाई केली होती.

47
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुचे सिनेसृष्टीत पदार्पण

‘सैराट’ सिनेमातून अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या दोघांच्या सिनेमाने भारतात आतापर्यंत सर्वाधिक कमाई केल्याचा रेकॉर्ड आहे. सिनेमाने 2650% नफा कमावला होता.

57
मराठी सिनेमाची बॉलिवूडला टक्कर

‘सैराट’ने सर्वाधिक कमाई करत ब्लॉकबस्टर सिनेमांना मागे टाकले. सिनेमाने भारतात 81 कोटी रूपयांची कमाई केली होती. ‘गदर’ (77 कोटी रूपये), ‘धूम-2’ (80 कोटी रूपये) आणि ‘ओम शांती ओम’ (78 कोटी रूपये) सारख्या सिनेमांनाही बॉक्स ऑफिसवरील कमाईत टक्कर दिली होती.

67
सैराट सिनेमाचा 2650 टक्के नफा

‘सैराट’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सिनेमाने 2650 टक्के नफा मिळवला होता. जो अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘कांतरा’ (2400 टक्के), ‘द कश्मीर फाइल्स’ (2170 टक्के) आणि ‘द केरला’ स्टोरी (1420 टक्के) सिनेमांपेक्षा अधिक आहे.

77
सैराट सिनेमाचा रिमेक

करण जौहरने ‘सैराट’ सिनेमाचा रिमेक करत बॉलिवूडमध्ये ‘धड़क’ नावाचा सिनेमा प्रदर्शित केला. या सिनेमात जान्हवी कपूर, इशान खट्टर मुख्य भुमिकेत दिसले. 30 कोटी रूपये बजेट असेल्या धड़क सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 113 कोटी रूपयांची कमाई केली होती.

आणखी वाचा : 

450 कोटींच्या 'Pushpa 2' सिनेमाबद्दल ही सर्वाधिक मोठी अपडेट आली समोर

बॉलिवूडमधील हे कलाकार यंदाच्या वर्षात OTTवर करणार पदार्पण

Hit And Run प्रकरणात अडकले गेलेत हे बॉलिवूड सेलेब्स

Share this Photo Gallery
Recommended Photos