AEIFF : Animal सारखा सिनेमा सुपर-डुपर हिट होणे ही बाब चिंताजनक, जावेद अख्तर यांचे परखड मत

AEIFF : बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी 'अ‍ॅनिमल' सिनेमाबाबत आपले परखड मत मांडले आहे. 

Harshada Shirsekar | Published : Jan 5, 2024 2:23 PM IST / Updated: Jan 05 2024, 08:32 PM IST
14
'अ‍ॅनिमल' सिनेमावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' सिनेमाने देशासह जगभरातील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ब्लॉकबस्टर ठरलेला हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे वादातही अडकला होता. तरीही सिनेमाने बम्पर कमाई केली. कलाकार मंडळींकडूनही सिनेमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. काहींनी सिनेमा शानदार असल्याचे म्हटले तर काही कलाकारांना अशा पद्धतीचा सिनेमा समाजासाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.

24
"...ही अतिशय चिंताजनक बाब"

आता प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Veteran Lyricist Javed Akhtar) यांनीही 'अ‍ॅनिमल' सिनेमावर परखड शब्दांत भाष्य केले आहे. "अ‍ॅनिमलसारखे सिनेमे सुपरहिट होणे ही बाब अतिशय चिंताजनक आहे", असे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी मांडले. 

नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Ajanta Ellora International Film Festival) त्यांनी हे विधान केले आहे. यावेळेस उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'अ‍ॅनिमल' सिनेमाच्या यशासाठी प्रेक्षकांना नव्हे तर निर्मात्यांना जबाबदार धरले पाहिजे.

34
गाजलेल्या गाण्याचंही दिले उदाहरण

सिनेमातील रणबीर कपूरच्या "माझे बूट चाट" या वादग्रस्त संवादावरही जावेद अख्तर यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "जर एखाद्या सिनेमामध्ये एक पुरुष एका महिलेला बूट चाटण्यास सांगत असेल... एका महिलेला थोबाडीत मारण्यात गैर काय आहे... असे चित्र दाखवणारा सिनेमा सुपर-डुपर हिट होत असेल तर हे अतिशय धोकादायक आहे". 

जावेद अख्तर यांनी पुढे ‘खलनायक’ सिनेमातील 'चोली के पीछे क्या है' या गाजलेल्या गाण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले की, काय स्वीकाराचे व काय नाकारायचे हे प्रेक्षकांनी ठरवले पाहिजे.

44
हल्लीच्या गाण्यांवरही व्यक्त केले मत

जावेद अख्तर पुढे असेही म्हणाले की, 'लोक मला विचारू लागले आहेत की सर आजकाल कशी गाणी तयार केली जात आहेत. गाणी सहा-सात जण मिळून तयार करतात. चोली के पिछे क्या है - हे गाणं एकाने लिहिले, दोन जणांनी संगीतबद्ध केले, दोन मुलींनी डान्स केला, एका कॅमेरामनने शूट केले. समस्या हे आठ -10 लोक नाहीत. हे गाणं सुपरहिट झाले होते ही समस्या आहे".

आणखी वाचा :

वैद्यकीयदृष्ट्या मी मेलो होतो...,श्रेयस तळपदेने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

Japan Earthquake : साऊथ स्टार ज्युनिअर NTR थोडक्यात बचावला, भूकंपापूर्वी परतला मायदेशी

Panchak : पंचक सिनेमाच्या रिलीजपूर्वी माधुरी दीक्षितने कुटुंबीयांसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

Share this Photo Gallery