Published : Jan 08, 2024, 12:15 PM ISTUpdated : Jan 08, 2024, 12:19 PM IST
अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खानचा नुकताच मुंबईत लग्नसोहळा पार पडला. पण आता उदयपूर येथे महाराष्ट्रीयन पद्धतीने आयरा-नुपूरचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
आमिर खान याची लेक आयरा खानने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नपत्रिकेची झलक दाखवली आहे. यामध्ये लग्नसोहळ्यादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल लिहिण्यात आले आहे.
210
पजामा पार्टी
लग्नपत्रिकेनुसार, 8 जानेवारीला पजामा पार्टी तर 9 जानेवारीला संगीत सेरेमनीचा सोहळा पार पडणार आहे.
310
महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न
10 जानेवारीला आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नसोहळा पार पडणार आहे.
410
उदयपुरमध्ये पार पडणार लग्नसोहळा
लग्नसोहळा उदयपुरमधील ताज अरावली रिसॉर्ट्समध्ये (Taj Aravali Resort & Spa) पार पडणार आहे. या रिसॉर्ट्समध्ये घरातील मंडळींसह पाहुण्यांसाठी 176 रूमचे बुकिंग करण्यात आले आहे.
510
पाहुण्यांसाठी खास सोय
लग्नसोहळ्यासाठी 250 जण उपस्थितीत राहण्याची अपेक्षा आहे. पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले असून खास फूड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
610
आयरा आणि नुपूर
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारीला मुंबईत विवाह केला. या विवाहासाठी आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, आजाद राव खान, जुनैद खान यांच्यासह अन्य खास पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.
710
नुपूर आहे फिटनेस ट्रेनर
आयरा खान ही मानसिक आरोग्यासंबंधित काम करणाऱ्या Agastu Foundationची फाउंडर आणि सीईओ आहे. नुपूर शिखरे हा प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आणि एथलीट आहे.
810
नुपूर आणि आयरा यांची लव्ह स्टोरी
आयरा आणि नुपूर वर्ष 2020 मध्ये लॉकडाउनदरम्यान एकमेकांना भेटले. सप्टेंबर 2022 मध्ये नुपूरने आयरला प्रपोज केले होते.
910
आयराचा साखरपुडा
आयरा आणि नुपूरचा साखरपुडा 2022 मध्ये झाला होता. यावेळी आमिर खान, रीना दत्तासह खास मित्रपरिवाराने साखरपुड्यासाठी उपस्थिती लावली होती.
1010
आयरा-नुपूरचे रिसेप्शन
आमिरची लेक आयरचे रिसेप्शन मुंबईत होणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन, शाहरुख खानसह अन्य कलाकार उपस्थिती लावू शकतात.