450 कोटींच्या ‘Pushpa 2’ सिनेमाबद्दल ही सर्वाधिक मोठी अपडेट आली समोर
Entertainment Jan 11 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
'पुष्पा 2' सिनेमा
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आपला आगामी सिनेमा 'पुष्पा 2' मुळे लाइमलाइटमध्ये आहे. चाहत्यांकडून अल्लू अर्जुनच्या या सिनेमाची प्रतीक्षा केली जात आहे.
Image credits: instagram
Marathi
पुष्पा 2 सिनेमाबद्दल अपडेट
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सिनेमाचे पोस्टर शेअर करत एक मोठी अपडेट दिली आहे.
Image credits: instagram
Marathi
या दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित
'पुष्पा 2' सिनेमा, स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामुळे सिनेमाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे तरण आदर्श यांनी म्हटलेय.
Image credits: instagram
Marathi
'सिंघम अगेन' Vs 'पुष्पा 2' सिनेमा
'पुष्पा 2' सिनेमासह अजय देवगण याचा 'सिंघम अगेन' सिनेमाही 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्श यांनी 'सिंघम अगेन'सोबत 'पुष्पा 2' सिनेमाचे क्लॅश होणार असल्याचेही म्हटले आहे.
Image credits: instagram
Marathi
सिनेमाचे बजेट
''पुष्पा 2' सिनेमाचे सुकुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाचे बजेट 450 कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सिनेमाचे शूटिंग लवकरच पूर्ण होणार आहे.
Image credits: instagram
Marathi
सिनेमासाठी घेतली ऐवढी फी
रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने पुष्पा 2 सिनेमासाठी 125 कोटी रूपयांची फी घेतली आहे. याआधी पुष्पा सिनेमासाठी 40 कोटी रूपये अभिनेत्याने घेतले होते.
Image credits: instagram
Marathi
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार
मीडिया रिपोर्ट्नुसार, वर्ष 2024 मध्ये अल्लू अर्जुन बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटी रूपयांची कमाई करेल असा अंदाज लावला जात आहे.