Entertainment

Bollywood

बॉलिवूडमधील हे कलाकार यंदाच्या वर्षात OTTवर करणार पदार्पण

Image credits: Social Media

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहुप्रतिक्षित सीरिज 'इंडियन पोलीस फोर्स' ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शिल्पा पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहे.

Image credits: Social Media

विवेक ओबेरॉय

विवेक ओबेरॉय देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजमध्ये झळकणार आहे.

Image credits: Social Media

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्राही शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय सोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करताना दिसून येणार आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजचे रोहित शेट्टी दिग्दर्शन करत आहेत.

Image credits: Social Media

वाणी कपूर

वाणी कपूर यंदाच्या वर्षी वेब सीरिज 'मंडला मर्डर्स' मध्ये दिसणार आहे. या सीरिजची वाणीच्या चाहत्यांकडून प्रतिक्षा केली जात आहे.

Image credits: Social Media

वरुण धवन

वरुण धवन वेब सीरिज ‘सिटाडेल इंडिया’ मध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये समंथा रुथ प्रभू देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

Image credits: Social Media

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्री 'तिवारी' नावाच्या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

Image credits: Social Media