सार

हेन्ले अँड पार्टनर्सच्या क्रमवारीत वाढ नोंदवणाऱ्या शहरांमध्ये चीनचे शेन्झेन शहर देखील या यादीत आहे. जिथे गेल्या वर्षांमध्ये करोडपतींची संख्या 140 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच या यादीत भारतातील देखील काही शहरांचा समावेश आहे. 

नुकताच ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इमिग्रेशन कन्सल्टन्सी फर्म हेन्ली अँड पार्टनर्सने श्रीमंत शहरांची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, न्यूयॉर्कमध्ये अंदाजे 350,000 करोडपती आहेत.जे इतर कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहे. तसेच या यादीत काही भारतातील शहरांचा देखील समावेश आहे. जाणून घेऊया सविस्तर.

प्रत्येक 24 रहिवाशांपैकी एकाकडे 7 अंकी संपत्ती : 

याचा अर्थ न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 8.26 मिलियन रहिवाश्यांपैकी प्रत्येकी 24 पैकी एकाची संपत्ती सात अंकी आहे. 2013 मध्ये हा आकडा 36 पैकी एक होता. न्यूयॉर्कमध्ये अजूनही अतिश्रीमंतांचा मोठा वाटा आहे. असे नोंदवले गेले आहे की 60 अब्जाधीश आणि 744 लोक आहेत ज्यांची गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता $100 दशलक्षपेक्षा जास्त आहे.

सिंगापुरात 3,400 मालमत्ताधारकांचे स्थलांतर :

या यादीत बे एरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकणी 305,700 लोकांकडे 7 अंकी संपत्ती आहे. ज्यामध्ये सॅन जोस, सॅन फ्रान्सिस्को आणि पालो अल्टो यांचा समावेश आहे. टोकियो 298,300 सह तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षांमधील ही ५ टक्के घसरण झाली आहे. सिंगापूर क्रमांक 4 वर आहे.करोडपतींचे स्थलांतर करणारे शहर बनले आहे. 2023 मध्ये जवळपास 3,400 मालमत्ताधारक येथे स्थलांतरित झाले आहेत.

या शहरांमध्ये करोडपतींच्या संख्येत घट :

काही जागतिक शहरांचे नशीब उलटले आहे तर लंडनने गेल्या दशकात आपल्या करोडपती लोकसंख्येपैकी 10% लोक गमावले आहे. यामध्ये ब्रिटनचा युरोपियन युनियन सोडण्याचा निर्णय देखील समाविष्ट आहे. हाँगकाँगमध्ये लक्षाधीशांच्या संख्येत 4% घट झाली कारण श्रीमंत लोक महामारीच्या वेळी चीनच्या लॉकडाउन नंतर सिंगापूरला स्थलांतरित झाले.

यादीत वाढत क्रमांक असणारी शहरे :

या यादीत वाढ नोंदवणाऱ्या शहरांमध्ये चीनच्या शेन्झेनचाही समावेश आहे. जिथे गेल्या वर्षांमध्ये करोडपतींच्या संख्येत 140% वाढ झाली आहे.तसेच भारतातील बेंगळुरू या शहराचा देखील समावेश या यादीत झाला आहे. त्याचप्रमाणे व्हिएतनाम येथील हो ची मिन्ह सिटी अमेरिकेतील स्कॉट्सडेल आणि ॲरिझोना येथे गेल्या 10 वर्षांत करोडपतींची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे.

दरडोई संपत्तीच्या आधारावर, मोनॅको जगातील 1 क्रमांकावर आहे, त्यातील 40% पेक्षा जास्त रहिवासी लक्षाधीश आहेत.

आणखी वाचा :

AstraZeneca कंपनीने जगभरातून परत मागवून घेतला कोविशिल्ड लसीचा साठा, नक्की कारण काय?

गेल्या वर्षी मिस यूएसए बनलेल्या नोएलिया वोइगटने अचानक पद सोडले?