सार

इतर कोणत्याही आजाराने रुग्णालयात गेल्यावर केलेल्या रक्त तपासणीत किंवा मूत्र तपासणीत साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. जर अनुवांशिकतेने मधुमेह असेल तर मुलांना धोका जास्त असतो.

मधुमेह आजकाल केवळ प्रौढांमध्येच नाही तर मुलांमध्येही आढळून येत आहे. मुलांमध्ये आढळणारा मधुमेह हा टाइप वन असतो. टाइप २ हा अत्यंत दुर्मिळ आहे. जुलाब, शारीरिक थकवा, जास्त प्रमाणात लघवी होणे, झोपेत लघवी होणे, वजन कमी होणे, भूक वाढणे ही मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे आहेत.

इतर कोणत्याही आजाराने रुग्णालयात गेल्यावर केलेल्या रक्त तपासणीत किंवा मूत्र तपासणीत साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. जर अनुवांशिकतेने मधुमेह असेल तर मुलांना धोका जास्त असतो.

मुलांमध्ये मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी काय करावे?

समतोल आहार घ्या

प्रक्रिया केलेले अन्न, गोड पेये, अस्वस्थ्यकर चरबीयुक्त आहारामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. फळे, भाज्या, धान्ये, प्रथिने यांसारख्या संतुलित आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास आणि एकंदर आरोग्यास मदत होते.

गोड पदार्थ मर्यादित करा

गोड पदार्थ, गोड पेये, प्रक्रिया केलेले स्नॅक्स यांचे सेवन कमी करा.

लठ्ठपणा टाळा

लठ्ठ मुलांमध्ये मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वजनाकडे लक्ष द्यावे. वय आणि उंचीनुसार वजन राखणे आवश्यक आहे.

व्यायाम करा

मोबाईल फोन आणि गेम्ससह घरात बसण्याऐवजी मुलांना व्यायाम आणि शारीरिक हालचाल करण्यास प्रोत्साहित करा.

झोप

झोपेच्या समस्यांमुळे मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या झोपेवरही लक्ष ठेवावे.