सार

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गणपतीच्या विशेष गाडीच्या स्वागतासाठी मुंबईतील कलारंग ग्रुपने 'शक्ती तूरा' लोककला सादर केली. याचा व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने लोकांचे मन जिंकली आहे.

Shakti Tura Folk Art Viral Video : गणेशोत्सवाच्या या मंगलमय वातावरणात, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर आनंद आणि उत्साहाचे लहरी वातावरण आहे. लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहे. गावातून शहरात आलेले नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावी परत जात आहेत. ७ सप्टेंबर रोजी गणपतीच्या आगमनाआधीच, मुंबई आणि ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी कोकणात जाणाऱ्या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या.

या उत्सवी वातावरणात, दादर रेल्वे स्थानकावर गणपतीच्या विशेष गाडीच्या स्वागतासाठी मुंबईतील कलारंग ग्रुपने 'शक्ती तूरा' लोककला सादर केली. 'शक्ती तूरा' ही कोकणातील पारंपारिक कला असून, पार्वती आणि महादेव यांच्यातील संवादातून विकसित झालेली आहे. या नृत्यकलेला विशेष महत्त्व असून, ती कोकणात सांस्कृतिक वारशाचा एक भाग मानली जाते.

दादर स्टेशनवर सादर करण्यात आलेल्या 'शक्ती तूरा' प्रदर्शनाने सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक वेषभूषेमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणी आणि तबला-ढोलकी वाजवणारे वादक यांची दृश्ये खरोखरच मनमोहक होती. प्रवाशांनी मोठ्या संख्येने या नृत्याचे कौतुक केले आणि अनेकजण मोबाइलमध्ये या अद्भुत प्रदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ घेताना दिसले.

 

View post on Instagram
 

 

या व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत लोकांचे मन जिंकले आहे. इंस्टाग्रामवर @aapla_amol आणि @kokani_aatma यांसारख्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले, "कोकणकर ज्या ठिकाणी जातो तिथे स्वर्ग बनवतो." दुसऱ्याने, "आम्ही कोकणकर तेव्हाच प्रसिद्ध झालो जेव्हा कोकणी म्हणून जन्माला आलो." तिसऱ्याने, "येवा कोकण आपलाच असा..", आणि चौथ्याने, "कोकणची संस्कृती, येवा कोकण आपलोच असा," असे उद्गार व्यक्त केले आहेत.

गणेशोत्सवाच्या या दिवशी दादर स्टेशनवर 'शक्ती तूरा' लोककलेचा आनंद घेताना प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह याने संपूर्ण वातावरण रंगून गेले आहे. ही घटना फक्त एक सांस्कृतिक अनुभव नाही, तर कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेचा गर्व आहे, ज्याने गणेशोत्सवाच्या आनंदात चार चांद लावले आहेत.

आणखी वाचा :

अनंत अंबानींची लालबागच्या राजाला भेट, किंमत 15 BMW एवढी