घरबसल्या एका क्लिकवर घ्या लालबागच्या राजाचे दर्शन!

| Published : Sep 08 2024, 08:13 AM IST / Updated: Sep 08 2024, 08:43 AM IST

Lalbaugcha Raja

सार

गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. कामाच्या व्यापामुळे अनेकांना लालबागमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. मात्र, आता तुम्ही घरबसल्या लाईव्ह दर्शनाचा लाभ घेऊ शकता.

Lalbaugcha Raja Live Streaming : 7 सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आहे. या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे 7 सप्टेंबरला आगमन झाले आहे. तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. गणेशोत्सवात ठिकठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. दरम्यान लालबागचा राजा मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील परळ परिसरात असलेल्या लालबागच्या राजाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. परंतु, लालबागचा राजाचे दर्शन घेणे, इतके सोपे नाही. अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर भक्तांना बापाची झलक दिसते. मात्र कामाचा व्याप, घरातील अडचणींमुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेणे अनेकांना शक्य होत नाही, अशा लोकांना आता घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.

घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन कसे घ्यायचे?

लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक मंडळाची अधिकृत वेबसाईट lalbaugcharaja.com येथे भेट देऊ शकतात. याशिवाय भाविक फेसबूक, इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातूनही आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊ शकतात.

फेसबूक

यूट्यूब

YouTube video player

लालबागमध्ये बाप्पाच्या दर्शनाची वेळ

लालबागचा राजाचे दर्शन सकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत करता येते. बाप्पाची तीन वेळा पूजा केली जाणार आहे. सकाळची पूजा सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत होणार आहे. दुपारची पूजा दुपारी 1 ते 2 या वेळेत तर संध्याकाळची पूजा सायंकाळी 7 ते 8 या वेळेत होणार आहे.

लालबागच्या राजाच्या आरतीची वेळ

सकाळची आरती संध्याकाळी 7 ते 7.15 दरम्यान असेल. दुपारची आरती रात्री 1 ते 1.15 या वेळेत होईल. सायंकाळची आरती सकाळी 7 ते सायंकाळी 7.15 या वेळेत होईल.

लालबागच्या राजाचा थोडक्यात इतिहास

लालबागच्या राजाची सर्वात प्रथम स्थापना 1934 साली करण्यात आली होती. दरम्यान 1932 मध्ये पेरू चाळ बंद पडल्याने स्थानिकांना मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांना कठीण परिस्थितीतून जावे लागल्याने त्यांना आपला माल रस्त्यावर विकावा लागत होता. यानंतर तेथील लोकांनी काही पैसे जमवले आणि गणपतीची छोटी मूर्तीची स्थापना केली होती. दोन वर्षानंतर लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आणि 12 सप्टेंबर 1934 पासून गणेशमूर्ती स्थापना करण्याची परंपरा सुरू झाली होती. पहिली मूर्ती साधी 2 फूट उंचीची मातीची मूर्ती होती. मात्र कालांतराने मूर्तीचा आकार आणि लोकप्रियताही वाढत गेली. दरम्यान, 1950 सालापासून लालबागचा राजा मुंबईतील प्रसिद्ध गणेश पंडाल मंडळ झाले होते.

आणखी वाचा :

गणेश चतुर्थीसाठी ५ शक्तिशाली मंत्र: जप केल्यास अडचणी लगेच होणार दूर