Heart, Diabetes सह 41औषधांच्या किमतींमध्ये केंद्रसरकार कडून कपात

| Published : May 16 2024, 08:24 PM IST

medicine

सार

सरकारने साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या मधुमेह, हृदय आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी केल्या आहेत.अँटासिड्स, मल्टीविटामिन्स आणि अँटीबायोटिक्स ही औषधे स्वस्त होणार आहेत.

 

सरकारने साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या मधुमेह, हृदय आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी केल्या आहेत.डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अँटासिड्स, मल्टीविटामिन्स आणि अँटीबायोटिक्स ही औषधे स्वस्त होणार आहेत.

पूर्वी, मल्टीविटामिन आणि अ‍ॅन्टिबायोटिक्सच्या जास्त किंमतींनी सामान्य उपचारांमध्ये आर्थिक भार होता. गेल्या महिन्यात, फार्मास्युटिकल्स विभागाने 923 शेड्यूल्ड औषध फॉर्म्युलेशनसाठी वार्षिक सुधारित कमाल मर्यादा किंमती आणि 65 फॉर्म्युलेशनसाठी सुधारित किरकोळ किमती जाहीर केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एनपीपीएने मधुमेह आणि उच्च रक्तदाबामध्ये वापरल्या जाणाऱ्या ६९ औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. दरम्यान, फार्मास्युटिकल्स विभागाने अधिक उद्योग सहभागी आणून औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या किंमती सुधारण्याच्या प्रयत्नांवर देखरेख करण्यासाठी समितीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

औषध कंपन्यांना किमती कामाच्या सूचना :

डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार औषध कंपन्यांना विविध औषधांच्या कमी झालेल्या किमतीची माहिती डीलर्स आणि स्टॉकिस्टना त्वरित प्रभावाने पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतात सर्वाधिक मधुमेह असलेले रुग्ण :

10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण असलेला भारत हा जागतिक स्तरावर सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये आहे. या किंमती कपातीमुळे औषधे आणि इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या अनेक रुग्णांना फायदा होणार आहे. NPPA च्या 143 व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

NPPA अधिकाऱ्यांचे काय म्हणणे :

औषधांच्या किमती आणि फॉर्म्युलेशन बदलणे हे NPPA सारख्या नियामक संस्थेसाठी एक प्रकारचे नियमित काम आहे. आम्ही खात्री करतो की लोकांसाठी आवश्यक असलेल्या औषधांवर कमाल मर्यादा आहे आणि सामान्य नागरिकांना किंमत परवडणारी राहील,असे NPPA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आधीच औषधांच्या किमती आणि नव्या किमती :

यकृतातील ग्लुकोजचे उत्पादन कमी करून रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डॅपग्लिफ्लोझिन मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड सारख्या औषधांच्या किमती एका टॅब्लेटसाठी पूर्वीच्या ₹ 30 च्या तुलनेत ₹16 निश्चित केल्या आहेत.तसेच दम्याची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बुडेसोनाइड आणि फॉर्मोटेरॉल सारख्या संयोजनांना एका डोससाठी किंमत ₹ 6.62 पर्यंत कमी करून अधिक परवडणारी बनविली गेली आहे . साधारणपणे, 120 डोस असलेली बाटली ₹ 3,800 मध्ये येते.

एनपीपीए सूचनेनुसार, अँटासिड अँटीगॅस जेल देखील आता स्वस्त आहे कारण त्याची किरकोळ किंमत ₹ 2.57 वरून ₹ 0.56 प्रति 1 मिली इतकी निश्चित करण्यात आली आहे. Atorvastatin, Clopidogrel आणि Aspirin कॅप्सूलच्या किमती सध्या ₹ 30 च्या तुलनेत एका कॅप्सूलसाठी ₹ 13.84 निश्चित केल्या आहेत .