वीर-झारा: यश चोप्राचे स्वप्न, मदन मोहनच्या सुरांचा अजरामर संगीतमय प्रवास

| Published : Nov 12 2024, 04:02 PM IST / Updated: Nov 12 2024, 04:03 PM IST

madan-mohan-son-sanjeev-kohli-speak-about-iconic-sing-tere-liye-veer-zara
वीर-झारा: यश चोप्राचे स्वप्न, मदन मोहनच्या सुरांचा अजरामर संगीतमय प्रवास
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वीर-ज़ारा चित्रपटाच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त, संगीतकार मदन मोहन यांचे सुपुत्र संजीव कोहली यांनी चित्रपटातील गाण्यांच्या निर्मितीची कथा सांगितली आणि वीर-ज़ारा कशाप्रकारे त्यांच्या वडिलांच्या संगीत वारशाचे स्वप्न साकार करण्यासारखे होते ते उलगडले.

यश चोप्रांना वीर-ज़ारा मधील गाणं "तेरे लिए" इतकं आवडायचं की, त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं हे गाणं त्यांच्या रिंगटोनचं स्वरूप होतं. या अनमोल प्रेमकहाणीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त, संगीतकार मदन मोहन यांचे सुपुत्र संजीव कोहली यांनी या साउंडट्रॅकच्या निर्मितीची कथा सांगितली आणि वीर-ज़ारा कशाप्रकारे त्याच्या वडिलांच्या संगीत वारशाचं स्वप्न साकार करण्यासारखं होतं ते उलगडलं.

संजय सांगतात, “वीर-ज़ारा माझ्यासाठी एक असं स्वप्न होतं ज्याला मी कधी खरं मानायची हिम्मतच केली नव्हती. हे एक पुत्राच्या नजरेतून आपल्या वडिलांच्या संगीत वारशासाठी साकार झालेलं स्वप्न होतं. माझे वडील, दिवंगत संगीतकार मदन मोहन, १९७५ साली अवघ्या ५१व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कडे अजूनही खूप काही निर्माण करण्याची संधी होती. मोठे बॅनर, नामवंत चित्रपट आणि लोकप्रिय पुरस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, आणि त्याचं त्यांना खूप दुःख होतं.”

संजय पुढे सांगतात, “२००३ मध्ये एके दिवशी यशजी म्हणाले की, सहा वर्षांनंतर त्यांनी एक चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु तो असा चित्रपट असावा ज्यात जुन्या काळाच्या संगीताची झलक असेल – पाश्चिमात्य प्रभावापासून दूर, भारतीय सांस्कृतिक ध्वनींवर आधारित एक सशक्त रचना, जणू काही ६०-७० च्या दशकातील हीर रांझा आणि लैला मजनू यांसारखं संगीत.”

संजय सांगतात, “यशजी पुढे म्हणाले की त्यांनी समकालीन संगीतकारांशी अनेक बैठका घेतल्या, परंतु त्या जुन्या संगीताच्या जादूचा अनुभव मिळाला नाही, कारण प्रत्येकाने त्यांच्या संगीताला आजच्या पाश्चिमात्य प्रभावासह रूपांतरित केलं होतं. हे ऐकून मी त्यांना सांगितलं की, माझ्याकडे काही जुन्या काळाच्या धुना आहेत ज्या २८ वर्षांपासून ऐकल्या गेल्या नाहीत. यशजी या विचाराने खूप उत्साहित झाले आणि त्यांनी मला माझ्या वडिलांच्या अनसुने संगीताची तपासणी करायला सांगितलं.”

संजय सांगतात, “मी जवळपास एक महिना हे जुने टेप्स ऐकून काढले. माझ्याकडे असलेल्या दोन-तीन कॅसेट्समधून तीन-चार धुना अशा होत्या की ज्या आजच्या काळातही चालतील असं मला वाटलं. यशजी आणि आदित्य यांनी त्या ऐकल्या आणि सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु त्या नव्या धाटणीने ऐकायच्या होत्या कारण जुनी रेकॉर्डिंग्जची ध्वनीक्षमता खूपच कमी होती.”

संजय सांगतात, “मी तीन संगीतकारांची एक टीम तयार केली आणि ३० धुना नव्या रेकॉर्डिंगसह तयार केल्या. मी स्वतः डमी लिरिक्स लिहिले आणि तीन युवा गायकांकरवी गाणी गायली. जेंव्हा यशजी आणि आदित्य यांनी ह्या धुनां ऐकल्या , तेव्हा ते खूप संतुष्ट होते. काही दिवसांत त्यांनी ३० पैकी १० गाणी निवडली आणि ती त्यांच्या स्क्रिप्टमध्ये योग्य त्या ठिकाणी दिली. मी खूपच भावूक झालो.”

यश चोप्रा वीर-ज़ारा मधील धुना फक्त लता मंगेशकर यांनी गायल्या पाहिजेत, ह्यावर ठाम होते. संजय सांगतात, “यशजींच्या मते लताजीच महिला गाणी गातील आणि हे मला खूप आनंदित करत होतं कारण माझ्या वडिलांच्या धुना नेहमीच लताजीसाठी तयार केलेल्या असायच्या. लताजींनी सुद्धा त्यांचा आंतरिक बळ दाखवत अप्रतिम गायलं.”

संजय म्हणतात, “वीर-ज़ारा च्या माध्यमातून माझं प्रत्येक स्वप्न एकाचवेळी साकार झालं. माझ्या वडिलांच्या धुना भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एका चित्रपटाचं साउंडट्रॅक बनल्या. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या धुनांवर नृत्य केलं, आणि त्यांची गाणी जवळजवळ एक वर्षभर चार्ट्सवर अग्रस्थानावर राहिली.”