Coca Cola Company : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे हिंदुस्थान कोका कोला कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
Coca Cola's New Plant In Konkan : खेड लोटे एमआयडीसी (MIDC) येथे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या (Hindustan coca cola company) प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. ३० नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. “कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. येथे जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल”,असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
‘अडीच हजार कोटींची गुंतवणूक’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे असंही म्हणाले की, “पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्योग वाढीसाठी पुढे येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प आणण्यात यश मिळवले. महाराष्ट्रात उद्योग, व्यापार वाढण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभात कोका कोलाला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या. या कंपनीत तब्बल अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. 60 उत्पादने (60 products) या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल.
Photos: कोका कोला कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याची मागणी
“गेले अनेक दिवस कोका कोला प्रकल्प रखडला होता. आम्ही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले व अल्पावधीतच सर्व सुविधा या कंपनीला उपलब्ध करून दिल्या. एमआयडीसीच्या माध्यमातून आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या. प्रकल्प सुरू झाल्यानंतर 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देणार आहोत”, असे यावेळेस उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
आणखी वाचा:
‘शासन आपल्या दारी’ शेतकऱ्याच्या आयुष्यात चमत्कार करी, सरकारी योजनेमुळे आले शेतकऱ्याला अच्छे दिन
शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट