Farming Tips : बियाणे-खते खरेदी करताना या गोष्टींकडे करताय दुर्लक्ष? होईल मोठे नुकसान

Published : Dec 02, 2023, 08:43 PM ISTUpdated : Dec 04, 2023, 02:09 PM IST
Farmer

सार

Maharashtra Farmer : बियाणे व खते खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Fertilizers Buying Tips: कृषि क्षेत्राचे (Agricultural Sector) उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी शासनाच्या कृषि विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बी-बियाणे (Seeds), खतांचा पुरवठा (Supply Of Fertilizers) वेळेत होण्यासाठीही प्रयत्न केला जातो. कारण बियाणे उत्तम दर्जाचे असल्याने शेती उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होणे शक्य असते. खतांमुळेही पिकांना पुरेशा प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. तसेच किटकनाशकांमुळे पिकांचे संरक्षण होते.

पण कधीकधी योग्य माहितीच उपलब्ध नसल्याने किंवा योग्य माहितीचे ज्ञान नसल्याने शेतकऱ्यांकडून खते-बियाणे खरेदी करताना चूक होऊ शकते. पण बियाणे, खते, कीटनाकशके खरेदी करताना व फवारणी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

शेतकऱ्यांनो या गोष्टी लक्षात ठेवा

  • गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या विक्रेत्यांकडूनच बियाणे-खते खरेदी करा
  • खरेदी पावतीवर बियाण्यांचा, खतांचा संपूर्ण माहिती नमूद केली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. उदाहरणार्थ - पीक, लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, खरेदी करणाऱ्याचे नाव- पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी
  • विकत घेतलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे, खते या सर्व गोष्टी पिकांची कापणी पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावे.
  • बियाणांची, खतांची पाकीटे सिलबंद असल्याची खात्री करून घ्यावी.
  • पाकिटांवरील अंतिम मुदत (Expiry Date) तपासून घ्या
  • फवारणीवेळी या गोष्टींचे काटेकोरपणे करा पालन
  • पिकांवर कीटकनाशकांची फवारणी (Spraying Of Pesticides On Crops) करताना तुमच्या शरीरास कोणताही अपाय होणार नाही, असे कपडे वापरावेत.
  • कीटकनाशकांचा वास घेणे टाळावे
  • फवारणी प्रक्रियेपासून लहान मुले, जनावरे, पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे
  • कीटकनाशकांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या तातडीने नष्ट करा
  • कीटकनाशक फवारण्याची प्रक्रिया दर दिवशी आठ तासांपेक्षा अधिक वेळ नसावी
  • कडक उन्हात, वादळीवारे, पावसात व पाऊस पडल्यानंतर लगेचच फवारणी करू नये

आणखी वाचा :

‘शासन आपल्या दारी’ शेतकऱ्याच्या आयुष्यात चमत्कार करी, सरकारी योजनेमुळे आले शेतकऱ्याला अच्छे दिन

शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट

बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक