Wildlife Conservation: निसर्गाचे संवर्धन होण्यासाठी वन विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. गेल्या काही काळापासून वाघांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. वाघांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. .
Vyaghra Prakalp Suvarna Mahotsav : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वन विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. नुकतेच कोथरूड येथे जिविधा संस्थेच्या वतीने व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व्याघ्र प्रकल्पविषयक प्रदर्शन व सर्वोत्कृष्ट गाईड पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातराज्यातील पहिल्या महिला गाइड आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गदर्शक शहनाज बेग यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट गाईड पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी उपस्थिती दर्शवली होती. ‘पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाचे संवर्धन (Conservation of nature) होणे ही काळाची गरज असून त्यासाठी वन विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. वन्यप्राणी जगवण्यासाठी नागरिकांनी वनव्यवस्थापनाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे’, अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली.
पुण्यातही राबवला जाणार मोठा उपक्रम
‘पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात गवताळ प्रदेश (Grayland) आहे, त्यामुळे येथे सफाऱ्या सुरू करत आहोत. वन विभागाच्यावतीने (Forest Department) टेकड्यांच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. आगामी काळात वनसंवर्धनासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे, आपल्या सूचना-कल्पना वनविभागाला कळवाव्या, असे आवाहनही यावेळेस मोहिते यांनी केले. शिवाय पुणे विभागात उत्तम मार्गदर्शक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळेस मोहिते यांनी दिली.
‘व्याघ्र संवर्धनासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे’
वाघांचे जतन (Vyaghra Samvardhan) करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी नोंदवावा. वाघांच्या संवर्धनासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या महिला मार्गदर्शक शहनाज बेग यांच्यासारख्या महिला मार्गदर्शकांची गरज असून समाजातील महिलांनीही या क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर यांनी केले.
पहिल्या महिला गाइड : शहनाज बेग
शहनाज बेग या आपल्या राज्यातील पहिल्या महिला गाइड (Women Guide) आहेत. वर्ष 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य (Tadoba National Park) येथे गाइड म्हणून त्या कार्यरत आहेत. परिसरातील अन्य महिलांनाही प्रोत्साहन देऊन त्यांना गाइड म्हणून घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचे योगदान आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, प्लास्टिकमुक्त ताडोबा यासारख्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्या सक्रीय आहेत.
आखणी वाचा:
Farming Tips : बियाणे-खते खरेदी करताना या गोष्टींकडे करताय दुर्लक्ष? होईल मोठे नुकसान
‘शासन आपल्या दारी’ शेतकऱ्याच्या आयुष्यात चमत्कार करी, सरकारी योजनेमुळे आले शेतकऱ्याला अच्छे दिन
शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट