शिंदे गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिंदे गटात एण्ट्री केली होती.
Rajya Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून (Eknath Shinde Shiv Sena) राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाने मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. गेल्या महिन्यात देवरा यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला होता.
माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतील दक्षिण-पूर्वचे खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने पक्षाला मोठा झटका बसला होता. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधी यांनी म्हटले होते की, मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षातून जावे, कारण त्यांची विचारसरणी पक्षानुरुप नाही.
मिलिंद देवरा यांचे ट्विट
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागील कारण आणि शिंदे गटात का एण्ट्री केली यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणार
रिपोर्ट्सनुसार, शिंदे गटांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद देवरा राज्यसभेच्या निवडणूकीसाठी 15 फेब्रुवारीला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अशोक चव्हाणांनीही सोडली काँग्रेस
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे धक्के बसत आहेत. मिलिंद देवरा यांच्यानंतर अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अशोक चव्हाणांसह अमर राजूरकर यांनी 13 फेब्रुवारीला भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
आणखी वाचा :
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव