Rajya Sabha Election 2024 : येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
BJP Candidates List for Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाने मेधा कुलकर्णी (Medha Vishram Kulkarni) आणि अजीत गोपछडे (Dr Ajeet Gopchade) यांना देखील संधी दिली आहे.
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मंगळवारी (13 फेब्रुवारी) अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. राज्यभेसाठी उमेदवारी दिल्याने अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.
अशोक चव्हाण कोण आहेत?
अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. शंकरराव चव्हाण काँग्रेस पक्षातील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते.अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 13 फेब्रुवारीला भाजप पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळले होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांना राज्यसभेसाठी भाजपकडून तिकिट दिले जाईल अशी चर्चा सुरू झाली होती. आज भाजपकडून अधिकृतरित्या चव्हाणांना उमेदावारी दिल्याचे समोर आले आहे.
कोण आहेत मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या म्हणून कार्य केले होते. वर्ष 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांच्या विरोधात विजय मिळवला होता. विशेष रुपात, मेधा कुलकर्णी पुणे येथील महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महिला सदस्यांपैकी एक आहेत.
डॉ. अजीत गोपछडे कोण आहेत?
डॉ. अजीत गोपछडे भारतातील राजकरणातील प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. भाजप पक्षात राहून गोपछडे वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. अजीत गोपछडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आहेत. याशिवाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशीही जोडले गेले आहेत. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी गोपछडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ. अजीत गोपछडे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कोल्हे बोरगांव गावात राहणारे आहेत.
आणखी वाचा :