पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 19 फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा दौरा पुढे ढकलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. अशातच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा काही कारणास्तव पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे.

PM Narendra Modi Maharashtra Visit Postponed : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. पण पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईतील कोस्टल रोडच्या (Mumbai Costal Road) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 19 फेब्रुवारीला होणार होते. 

याशिवाय पंतप्रधान मुंबईसह सातारा (Satara) आणि पुणे (Pune) येथे देखील जाणार होते. या दौऱ्यादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांना प्रतिष्ठित शिव सन्मान पुरस्कारही प्रदान केला जाणार होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आधी पुणे येथील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याला (Shivneri Fort) भेट देणार होते. यानंतर सातारामधील आंधली बांध येथे जाणार होते. दौऱ्यादरम्यान, आणखी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम जलपूजा समारंभ पार पडणार होता. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि माढाचे खासदार रणजित नाईक-निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) अशा प्रमुख राजकीय व्यक्ती असणार होत्या.

नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा पुढे ढकलण्यात आल्याने आता कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) च्या दुहेरी बोगद्यासाठी भूमिपूजन समारंभ, मेट्रो-3 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी एकात्मिक चाचणी या गोष्टींसाठी वाट पाहावी लागणार आहे.

आणखी वाचा : 

Cyber Crime in Maharashtra : राज्यात प्रत्येक दिवशी सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांचे होतेय तीन कोटी रुपयांचे नुकसान

Maharashtra : 'गीताभक्ती' कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती, म्हणाले- मुघलांमुळे नव्हे शिवाजी महाराजांमुळे आमची ओळख

Rajya Sabha Elections 2024 : 15 राज्यातील 56 जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार, पाहा महाराष्ट्रात किती जागा

Share this article