2nd July 2025 News Updates : देशभरात आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय काही ठिकाणी वाहतूक कोडींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला राम मंदिर चोरी प्रकरण, दिल्लीत जापानच्या पंतप्रधानांचा दौरा आहे. अशा ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स पाहा.

11:46 PM (IST) Jul 02
10:24 PM (IST) Jul 02
10:21 PM (IST) Jul 02
09:08 PM (IST) Jul 02
Gold Rate Today : सोने-चांदी दरात आज वाढ झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून किमतीत चढ-उतार होत आहेत. अमेरिका आणि इराण या दोन देशांतील संघर्षाचा परिणाम भारतातील सराफा बाजारात मौल्यवान धातूवर झाल्याचं दिसतं आहे.
07:42 PM (IST) Jul 02
केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक झाली असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सियाने कोर्टात तिचे वकील विपुल दुशिंग असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे केतनच्या मोबाईलमधून डेटा डिलीट झाल्याचा संशय पोलिसांना आहे, ज्यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
07:08 PM (IST) Jul 02
Sakinaka Manhole Incident : साकीनाका परिसरात एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी माहिती दिली आहे.
06:51 PM (IST) Jul 02
05:15 PM (IST) Jul 02
04:32 PM (IST) Jul 02
EPFO Portal Down : ईपीएफओ पोर्टल डाऊन झाल्याने अनेक नोकरदारांना पीएफसंबंधी कामं करताना सतत एरर येत आहे. या पीएफ पोर्टलबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
02:52 PM (IST) Jul 02
Pune Ketan Agarwal Lohagad Case : पुण्यातील केतन अग्रवालची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने हत्या केली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी दोघांनी लग्न करुन राजस्थानला राहण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती समोर आली आहे.
02:31 PM (IST) Jul 02
चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाडं पडल्याची घटना ताजी असताना आणखी एक दुर्घटना घडली आहे. साकीनाका खैरानी रोडवर मोठी दुर्घटना घडली असून तेथील एका मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची बातमी समोर आली आहे.
12:52 PM (IST) Jul 02
येत्या ४ आणि ५ जुलैला अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच परिस्थितीनुसार शाळांबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतला जाईल.
12:04 PM (IST) Jul 02
मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा विचार होत आहे. यावर शिवसेनेच्या विधान परिषदेच्या सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मनीषा कायंदे यांनी म्हटले की, ‘आम्ही सर्वजण श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देतो. मला वाटते की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विशेषाधिकार आहे. तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे यावर निर्णय घेतील.’
11:16 AM (IST) Jul 02
मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging witnessed in parts of Mumbai following heavy rainfall.
(Visuals from Bharat Nagar) pic.twitter.com/luMkfhrLKO— ANI (@ANI) July 2, 2026