Health Benefits of Eating on Banana Leaf In Marathi केळीच्या पानावर जेवल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती…
Benefits Of Eating Food On Banana Leaf : प्राचीन काळापासून आपल्या देशातील बहुतांश भागांमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढून त्याचा आस्वाद घेण्याची परंपरा आहे. केळीच्या पानावर जेवणाचे शास्त्र, कारणे, परंपरेप्रमाणेच आरोग्यदायी फायदेही अनेक आहेत.
आजही आपल्यापैकी बरेच जण सण-उत्सव, पूजा आणि कौटुंबिक भेटीदरम्यान पंचपक्वान्न वाढण्यासाठी केळीच्याच पानांचा वापर करतात. इतकेच नव्हे तर देवीदेवतांना नैवेद्य दाखवताना तसंच प्रसाद देण्यासाठी याच पानांचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे.
केळीच्या पानांमध्ये पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. म्हणूनच स्टील धातूची, काचेची, कागदी किंवा प्लास्टिकच्या प्लेटऐवजी जेवणासाठी केळीच्या पानांचा वापर केल्यास आरोग्यास (Health Tips News) कोणकोणते लाभ मिळू शकतात? याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ डॉ. पूर्वी भट यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया सविस्तर…
केळीच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबियल (Antimicrobial) हे घटक आहेत. संशोधकांनी केलेल्या काही अभ्यासातील माहितीनुसार, केळीच्या पानांवर जेवण जेवल्यास ई कोलाय इंफेक्शनसह (E Coli infection) (Escherichia Coli) कित्येक संसर्गजन्य आजारांविरोधात लढण्यात मदत मिळते. जेवणाच्या माध्यमातून होणाऱ्या आजारांचाही धोका कमी होण्यास मदत मिळते.
केळीच्या पानांमध्ये आरोग्यास (Health Tips In Marathi) पोषक असणाऱ्या औषधी घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या पानांमध्ये पॉलिफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. या पानावर गरमागरम खाद्यपदार्थ वाढल्यास अन्नातील पोषकमूल्य अधिक वाढतात. या पानांमध्ये आरोग्यवर्धक पोषक घटकांचा समावेश असल्याने भूक देखील लागते.
संशोधकांना असेही आढळले आहे की केळीच्या पानांवर जेवल्यास शरीरात पाचक रसांचा स्त्राव (Beneficial For Digestive Juices) होण्यासही मदत मिळते. ज्यामुळे अन्नाच्या पचनक्रियेचं कार्य सुरळीतपणे पार पडते. तसंच पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते.
प्लास्टिक, थर्माकोलच्या प्लेट्स पर्यावरणपूरक नाहीत. यांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय या घटकांचे आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. दुसरीकडे केळीची पाने पर्यावरणपूरक आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पानांचा खत म्हणूनही वापर केला जाऊ शकतो.
आपण नीट पाहिल्यास केळीच्या पानांवर (Kelichya Panavar Jevnyache Fayade) नैसर्गिक स्वरुपात मेणासारखा असा पातळ थर असतो. पानांवर गरमागरम जेवण वाढल्यानंतर हा थर वितळतो आणि पानातील औषधी गुणधर्म जेवणामध्ये एकजीव होतात. ज्यामुळे अन्नाची चव वाढते व एक वेगळाच सुगंधही अनुभवायला मिळतो.
पानावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील, अशाच पानांची निवड करावी. डाग असलेल्या पानांचा जेवणासाठी वापर करत नाहीत. डागाळलेले पान म्हणजे त्या वनस्पतीला एखाद्या जंतू किंवा विषाणूंचा संसर्ग झाला असण्याची शक्यता असू शकते.
कोवळ्या पानांची निवड करावी (Kelichya Panachi Nivad Kashi Karavi), जेणेकरून जेवताना पान फाटणार नाहीत. अंगणातून किंवा मार्केटमधून पाने आणल्यानंतर सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या व यानंतर एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या. जेवण वाढण्यापूर्वी पानांवर एकदा पाणी शिंपडून ती स्वच्छ करून घ्यावीत. मगच जेवण वाढावे.
Content Credit instagram @herbeshwari