बिहारच्या गया जिल्ह्यात बिहिया नावाचे गाव आहे. या गावाचा एक इतिहास आहे. तीन शतकांपासून इथले लोक नियम आणि सांस्कृतिक, आध्यात्मिक परंपरांचे पालन करत आहेत. ४०० कुटुंबे असलेल्या या गावात ३०० वर्षांपासून सर्वजण शाकाहारी आहेत. ब्रह्म बाबाच्या क्रोधाला बळी पडू नये म्हणून शाकाहारी जीवनशैलीचे पालन करावे, अशी त्यांची श्रद्धा आहे.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेचे पालन आजही केले जाते. या गावात लग्न करून येणाऱ्यांनाही हीच जीवनशैली स्वीकारावी लागते. ते शाकाहारी बनतात. ते मद्यपान करत नाहीत. कांदा आणि लसूणही ते खाणार नाहीत. या गावासोबतच आणखी एक गाव पूर्णपणे शाकाहारी आहे. ते महाराष्ट्रात आहे.