सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला | Nanded Attack | Sukhbir Singh Badal

Published : Aug 13, 2026, 09:00 PM IST

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेडमध्ये माता साहिब गुरुद्वारात हल्ला झाल्याची घटना घडली. दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर असताना बादल विविध गुरुद्वारांना भेट देत होते. त्यावेळी निहंग शीखांच्या वेशातील एका व्यक्तीने कृपाणचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात सुखबीर सिंह बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना वाचवताना संबंधित पोलीस निरीक्षकही जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी बादल यांच्या पत्नी आणि लोकसभा खासदार हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दोन जण हल्ल्यात सहभागी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हा दावा फेटाळला आहे. केवळ एका आरोपीचा सहभाग असून त्याचे नाव जसपाल सिंह असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो गेल्या दोन वर्षांपासून माता साहिब गुरुद्वारात सेवदार म्हणून कार्यरत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले असून हल्ल्यामागील नेमका हेतू शोधण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

03:11एकनाथ शिंदे: बुलढाण्यात शेतकऱ्यांना मदत देणार | Maharashtra Drought
07:03Ambadas Danve | अंबादास दानवे: शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजार द्या | Maharashtra Drought
03:04IIT bombay | साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण | राज ठाकरे हे जातीयवादी - सुजात आंबडेकर
02:42Lalbaugcha Raja | देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह घेतलं बाप्पाचं दर्शन | Ganpati Bappa Morya
04:31घोषणा करतात, देत काहीच नाहीत, सर्व प्रकारची कर्जमाफ करा, विजय वडेट्टीवार
07:05Devendra Fadnavis | लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस: शनिवारपूर्वी दुष्काळ GR | Maharashtra Drought
03:13Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार | Ganpati Bappa Morya
07:53प्रताप सरनाईक: उद्यापासून स्थळ पंचनामे सुरू | Maharashtra Drought
15:51Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस: दुष्काळाची अधिसूचना 3 दिवसांत | Maharashtra Drought
08:07Eknath Shinde | दुष्काळावर एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही | Maharashtra Drought