
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रात्री त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. छातीतील संसर्ग आणि ब्राँकायटिससारखा त्रास होत असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.