Sanjay Raut l गोकुळच्या बहुमतावरून संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

Sanjay Raut l गोकुळच्या बहुमतावरून संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

Published : Nov 05, 2026, 04:02 PM IST

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवलं असतानाही सरकार पराभूतांना पुन्हा सत्ता देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गोकुळ गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्याचा डाव असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या कौलाचा अनादर होत असल्याचं सांगत गोकुळ वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येऊन जनआंदोलन उभारावं, अशी भूमिका राऊतांनी मांडली. या निर्णयाची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.