निवडणूक आयोगाविरोधात राज-उद्धव ठाकरेंचा मोर्चा | Raj Thackeray | Uddhav Thackeray

निवडणूक आयोगाविरोधात राज-उद्धव ठाकरेंचा मोर्चा | Raj Thackeray | Uddhav Thackeray

Published : Sep 29, 2026, 03:00 PM IST

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात 4 तारखेला संयुक्त मोर्चाची घोषणा केली. भायखळ्यातील Richardson Cruddas येथून मोर्चाला सुरुवात होऊन मुंबई महानगरपालिकेसमोर त्याचे सभेत रूपांतर होणार आहे. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, सर्वांच्या हातात तिरंगा असेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्यासाठी संपर्क केला जाणार असून निवडणूक आयोग, EVM आणि SIR संदर्भातील मुद्द्यांवर 4 तारखेला सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले. मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी 2 तारखेच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसोबत राहणार असल्याचे सांगितले.