ओवैसी: 5 वर्षांपासून अल्पसंख्याक शिष्यवृत्ती नाही

ओवैसी: 5 वर्षांपासून अल्पसंख्याक शिष्यवृत्ती नाही

Published : Sep 28, 2026, 09:06 PM IST

असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणातील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत मजलिसने केलेल्या कामांचा उल्लेख केला. तेलंगणात मुस्लिम विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग देशात सर्वाधिक असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी 2014 नंतर केंद्र सरकारने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय कमकुवत केल्याचा आरोप करत गेल्या पाच वर्षांपासून प्री-मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक आणि मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्तीचे पैसे दिले जात नसल्याचे ओवैसी म्हणाले.